Eknath Khadse : एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ; संपूर्ण कुटुंबाला १३७ कोटींच्या दंडाची नोटीस; काय आहे प्रकरण?

121
Eknath Khadse : एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ; संपूर्ण कुटुंबाला १३७ कोटींच्या दंडाची नोटीस; काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांना १३७ कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी खडसे कुटुंबीयांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनाही ही नोटीस बजावण्यात आली आहे.

अधिक माहितीनुसार, (Eknath Khadse) अवैधरीत्या १ लाख १८ हजार २०२.१५८ ब्रास मुरूमाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी आमदार एकनाथ खडसे , त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्यासह ६ शेतजमीन मालकांना १३७ कोटींवर दंडाची नोटीस मुक्ताईनगर तहसीलदारांनी बजावली आहे. या धक्कादायक कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

या नोटीनुसार अवैधरीत्या उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे मूल्य २६ कोटी १ लाख १२ हजार ११७ इतके आहे. यापोटी पाच पटींनी दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार १३७ कोटी १४ लाख ८१ हजार ८८३ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. (Eknath Khadse)

(हेही वाचा – Ind vs Ban : बांगलादेश विरुद्ध खेळताना विराट कोहलीला आहे ‘या’ गोलंदाजाची चिंता )

नेमका प्रकार काय?

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. खडसे (Eknath Khadse) परिवारातील सदस्यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर. जमिनीची खरेदी करण्यात आली. गौण खनिजासाठी अवैध उत्खनन करीत ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. राज्य शासनाने यासाठी एसआयटी स्थापन केली होती. पथकाने सादर केलेला अहवाल सरकारने स्वीकारला आहे. त्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशातच या सर्व प्रकारावर एकनाथ खडसे यांनी “सारे राजकीयदृष्ट्या सुरू आहे. शेतजमिनी आमच्या नावावर असल्या, तरी अवैध गौण खनिजाच्या उत्खननाशी आमचा दुरान्वये संबंध नाही. त्यामुळे योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ.” असे उत्तर दिले आहे. (Eknath Khadse)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.