Shri Ram Mandir : राम मंदिरासाठी स्वीकारता येणार परदेशी निधी

‘एफसीआरए’ कडून मिळाली निधी स्वीकारण्याची परवानगी

154
Shri Ram Mandir : राम मंदिरासाठी स्वीकारता येणार परदेशी निधी

सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर अयोध्येत श्री राम जन्मभूमी (Shri Ram Mandir) तिर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून अयोध्येत रामाचे मंदिर उभारले जात आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी आता परदेशातूनही निधी स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

श्री राम जन्मभूमी (Shri Ram Mandir) तिर्थक्षेत्र ट्रस्टला ‘फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन एक्ट’ (एफसीआरए) अनुसार परदेशी व्यक्तीकडून निधी स्विकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. ट्रस्टने यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. ट्रस्टच्या ट्विट अनुसार गृह मंत्रालयाच्या एफसीआरए सेक्शनने ‘श्री राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र’ची परदेशातून निधी स्विकारण्यासाठी नोंदणी केली आहे.

(हेही वाचा – Eknath Khadse : एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ; संपूर्ण कुटुंबाला १३७ कोटींच्या दंडाची नोटीस; काय आहे प्रकरण?)

परदेशातून मिळालेला हा निधी (Shri Ram Mandir) एकाच बँकेतील अकाऊंटमध्ये पाठवता येईल. दुसऱ्या बँकेत किंवा दुसऱ्या अकाऊंटवर हे पैसे पाठवता येणार नाहीत. एनजीओ किंवा ट्रस्ट परदेशातून मिळालेला निधी केवळ संसद मार्ग शाखेच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अकाऊंटमध्येच मिळवू शकतात. परदेशातून निधी मिळवता यावा यासाठी ट्रस्टने जून महिन्यामध्ये एफसीआरएकडे अर्ज सादर केला होता. त्यानंतर बुधवार १८ ऑक्टोबर रोजी एफसीआरएकडून त्यांना अखेर मंजुरी मिळाली आहे.

श्रीराम जन्मभूमी (Shri Ram Mandir) तिर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना २०२० मध्ये करण्यात आली होती. देशातील भाविक आणि नागरिकांकडून राम मंदिराच्या उभारण्यासाठी निधी मिळवण्याचे काम ट्रस्ट करत होती. पण, अद्याप परदेशात असलेल्या भारतीयांकडून निधी घेण्याची त्यांना परवानगी मिळाली नव्हती. आता तो मार्ग देखील खुला झाला आहे. (Shri Ram Mandir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.