Rohit Sharma Fined : रोहीत शर्माला वेगाने लँबॉर्गिनी चालवल्याबद्दल दंड 

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर वेगाने आपली लँबॉर्गिनी चालवल्याबद्दल रोहीत शर्माला एकदा नव्हे तर तिसऱ्यांदा दंड झाला आहे.

156
Rohit Sharma Fined : रोहीत शर्माला वेगाने लँबॉर्गिनी चालवल्याबद्दल दंड 
Rohit Sharma Fined : रोहीत शर्माला वेगाने लँबॉर्गिनी चालवल्याबद्दल दंड 

ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी पुण्यात आहे. आणि इथं भारतीय कर्णधार रोहीत शर्माने (Rohit Sharma Fined) त्याची लाडकी लँबॉर्गिनी गाडी ताशी २०० किमीच्या वेगाने चालवली. त्यामुळे पुणे वाहतूक शाखेनं भारतीय कर्णधाराला तीन पावत्या दिल्याची बातमी मुंबई मिरर या वृत्तपत्राने दिली आहे.

झालं असं की बांगलादेश विरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहीत शर्मा (Rohit Sharma Fined) त्याच्या घरी मुंबईला गेला होता. तिथून तो पुण्यात दाखल झाला. तो आला तो त्याची आवडती लँबॉर्गिनी गाडी घेऊन पण, मुंबईहून पुण्याला येताना तो ताशी २०० किमी वेगाने गाडी हाकत होता. त्यामुळे वाहतूक शाखेनं कारवाई केली आहे.

(हेही वाचा-Shri Ram Mandir : राम मंदिरासाठी स्वीकारता येणार परदेशी निधी)

वाहतूक शाखेतील सूत्रांच्या हवाल्याने मुंबई मिररने ही बातमी दिली आहे. रोहीतच्या गाडीचा वेग प्रसंगी २१५ किमीही होता, असं त्या बातमीत म्हटलं आहे. शिवाय विश्वचषकासाठी महत्त्वाची स्पर्धा सुरू असताना रोहीतने स्वत:ची गाडी चालवत आल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे. रोहीतने संघाबरोबर संघाच्या बसमधून प्रवास करायला हवा होता, अशीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

वेगमर्यादा ओलांडणे, सुरक्षितपणे प्रवास न करणे तसंच चालवताना शिस्त न पाळणं या नियमभंगांसाठी रोहीतला पावत्या देण्यात आल्या.

विश्वचषकातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये रोहीत चांगलाच फॉर्ममध्ये आहे. आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा भोपळा सोडला तर रोहीतने १३१ आणि ८४ धावांची खेळी केली आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.