Mahua Moitra Case : महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचे प्रकरण चांगलेच गाजणार

लोकसभेची एथिक्स कमिटी करणार २६ ऑक्टोबरला सुनावणी

138
Mahua Moitra Case : महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचे प्रकरण चांगलेच गाजणार
Mahua Moitra Case : महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचे प्रकरण चांगलेच गाजणार

देशाची संसद प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी हक्काची जागा आहे. कारण तिथेच आपल्या प्रश्नांना न्याय मिळू शकतो, हा विश्वास प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या मनात आहे. जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठीच लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात. मात्र हेच लोकप्रतिनिधी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेत असतील तर, सामान्य नागरिकांनी कुणाकडे दाद मागायची हा प्रश्न निश्चितच निर्माण होतो. (Mahua Moitra Case)

झाले असे की, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. खासदार निशिकांत दुबे यांनी हा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे राजधानीतील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. या आरोपाची दखल घेत लोकसभेची एथिक्स कमिटी येत्या २६ ऑक्टोबरला सुनावणी करणार आहे. यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अडचणी निश्चितच वाढणार आहेत. दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच लोकसभेची एथिक्स कमिटी या प्रकरणावर २६ ऑक्टोबरला सुनावणी करणार असल्यामुळे राजकीय दृष्टीने वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. (Mahua Moitra Case)

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला होता. लोकसभेची एथिक्स कमिटी या प्रकरणावर २६ ऑक्टोबरला सुनावणी करणार आहे. यासाठी समितीने निशिकांत दुबे यांना पाचारण केले आहे. लोकसभेचे उपसचिव बाला गुरू यांनी बुधवारी दुबे यांना नोटीस बजावताना ही माहिती दिली. निशिकांत सुनावणीला उपस्थित राहणार की नाही, याबाबत त्यांना २० ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. संसदेच्या समिती कक्षात ही सुनावणी होणार आहे. (Mahua Moitra Case)

(हेही वाचा – Sharad Pawar On Palestine : शरद पवार सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवतील; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा टोला)

निशिकांत यांनी अध्यक्षांना पत्र लिहून केली होती तक्रार

झारखंडमधील गोड्डा येथील खासदार दुबे यांनी १५ ऑक्टोबर रोजी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले होते. त्याचे शीर्षक होते- ‘री-इमरजेंस ऑफ नैस्टी कैश फॉर क्वेरी इन पार्लियामेंट’. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवार, १७ ऑक्टोबर रोजी निशीकांत दुबे यांची तक्रार आचार समितीकडे पाठवली होती. (Mahua Moitra Case)

लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिताना निशिकांत यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप केला होता की, सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी मोईत्रा यांनी मुंबईतील व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून भेटवस्तू आणि रोख रक्कम घेतली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करावी आणि महुआ मोइत्रा यांना सभागृहातून निलंबित करावे, अशी मागणी निशिकांत यांनी अध्यक्षांकडे केली होती. पत्रात, त्यांनी विशेषाधिकारांचे गंभीर उल्लंघन, सदनाचा अपमान आणि आयपीसीच्या कलम १२०A अंतर्गत फौजदारी खटला नोंदवण्याबद्दल लिहिले होते. (Mahua Moitra Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.