आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शरद पवार यांच्यावर टीका करतांना ‘शरद पवार सुप्रिया सुळे यांना गाझा येथे पाठवतील’, असे वक्तव्य केले होते. (Supriya Sule) त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप चालू केले आहेत. (Supriya Sule)
(हेही वाचा – Sharad Pawar On Palestine : शरद पवार सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवतील; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा टोला)
गाझाला पाठवण्याच्या वक्तव्यावर सुप्रिया म्हणाल्या, ”मी आणि हिमंता बिस्वा सरमा यांनी यापूर्वी काँग्रेसमध्ये एकत्र काम केले आहे. हिमंता सरमा यांच्या वक्तव्यामुळे मला आश्चर्य वाटत आहे. माझा एक मित्र काँग्रेसमधून भाजपमध्ये जाऊन मुख्यमंत्री झाल्याचा मला आनंद झाला होता. भाजपमध्ये महिलांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. भाजपच्या आयटी सेलला शरद पवार काय म्हणाले आहेत, हे समजून घेण्याची गरज आहे.” (Supriya Sule)
“मला वाटतं की, सुप्रिया सुळेंना शरद पवार हमासच्या दहशतवाद्यांशी लढायला गाझाला पाठवतील”, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले होते. इस्रायल-पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सुरू झालेल्या या राजकीय गदारोळात एकीकडे भाजप इस्रायलच्या पाठीशी उभा असल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे बहुतांश बिगर भाजप पक्ष पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ उघडपणे वक्तव्ये करत आहेत. (Supriya Sule)
एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर बोलतांना शरद पवार यांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली होती. ”ज्या भागात युद्ध सुरू आहे, ती जमीन ही पॅलेस्टिनी लोकांची आहे. तिथे अतिक्रमण झाले आणि इस्रायल देश उदयाला आला. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपासून, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी या सर्वांची पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका होती. दुर्दैवाने आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी (नरेंद्र मोदी) इस्रायलची बाजू घेतली आहे. ते करत असतांना त्या जमिनीचे मूळ मालक असलेल्या पॅलेस्टाईनकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांची भूमिका काहीही असो; परंतु आपली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्वच्छ असली पाहिजे”, असे शरद पवार या वेळी म्हणाले होते. (Supriya Sule)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community