केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी अमृतसर भेटीदरम्यान अटारी सीमेवर देशाचा सर्वोच्च तिरंगा ध्वज फडकावला. ते म्हणाले की, सीमेवर लावण्यात आलेला हा तिरंगा विशेष टेहळणी तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्याच्या वर एक यंत्रणा बसवण्यात आली आहे, जी सीमेवर आपल्या सैनिकांवर नजर ठेवण्यास मदत करेल. हा ध्वज पाकिस्तानच्या सीमेवर लांबून दिसतो. याची उंची ४० मजली इमारतीएवढी आहे.नितीन गडकरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. (HIGHEST NATIONAL FLAG )
अटारी सीमेवर लावलेला हा तिरंगा शेजारील देश पाकिस्तानच्या ध्वजापेक्षा १८ फूट उंच आहे. यापूर्वी भारतीय तिरंग्याच्या खांबाची उंची ३६० फूट होती, तर पाकिस्तानच्या ध्वजाच्या खांबाची उंची ४०० फूट होती. आता गोल्डन गेटसमोर तयार केलेल्या ४१८ फूट उंच खांबावर भारताचा तिरंगा फडकत आहे.
३.५ कोटी रुपये खर्च केले
हा ध्वज खांब भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) ३.५ कोटी रुपयांना बसवला आहे. यापूर्वी कर्नाटकातील बेळगावमध्ये देशातील सर्वात उंच ३६०. ८ फूट उंच ध्वज फडकत होता. आता अटारी सीमेवर ४१८ फूट उंचीचा देशाचा सर्वात उंच तिरंगा ध्वज उभारण्यात आला आहे.
(हेही वाचा : PLANE CRASH : बारामतीत शिकाऊ विमान कोसळले, पायलट किरकोळ जखमी)
या ध्वजाच्या खांबाला आधार देण्यासाठी जमिनीवर सुमारे ४ फूट उंचीचा प्लॅटफॉर्मही बांधण्यात आला आहे. हा तिरंगा ध्वज गोल्डन गेटसमोर असलेल्या जुन्या ध्वजापासून थोड्या अंतरावर बनवण्यात आला आहे. हा ध्वज भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बसवला आहे. हा ध्वज पाकिस्तानच्या सीमेच्या आत अनेक किलोमीटर अंतरावरून स्पष्टपणे दिसतो.हा भव्य तिरंगा बनवण्यासाठी ९० किलो कापड वापरण्यात आले आहे. या झेंड्याच्या कापडाचे क्षेत्रफळ सुमारे ११०० यार्ड, म्हणजेच लांबी आणि रुंदी १२०*८० फूट आहे. आत्तापर्यंत देशातील सर्वात उंच तिरंगा ध्वज कर्नाटकातील बेळगावमध्ये स्थापित करण्यात आला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community