PM NARENDRA MODI : मोदींनी सांगितली कौशल्य विकासामागची भूमिका, परदेशात मिळेल ४० लाख युवकांना नोकरी

भारतात युवकांना या सगळ्या क्षेत्रात प्रशिक्षण देण्याचं काम आपण करत आहोत, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.

134
PM NARENDRA MODI : मोदींनी सांगितली कौशल्य विकासामागची भूमिका, परदेशात मिळेल ४० लाख युवकांना नोकरी
PM NARENDRA MODI : मोदींनी सांगितली कौशल्य विकासामागची भूमिका, परदेशात मिळेल ४० लाख युवकांना नोकरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. मोदींनी ऑनलाईन पद्धतीने या केंद्रांचं उद्घाटन केलं. राज्यातल्या ५११ ग्रामपंचायतींमध्ये या कौशल्य केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे.परदेशात ४० लाख प्रशिक्षित युवकांना नोकरी द्यायची आहे. भारतात युवकांना या सगळ्या क्षेत्रात प्रशिक्षण देण्याचं काम आपण करत आहोत, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. (PM NARENDRA MODI)

प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जगामध्ये तरुणांचा देश म्हणून भारताकडे बघितलं जातं. त्यामुळे भविष्यात भारतीय तरुणांच्या हाताला काम मिळण्याच्या मोठ्या संधी निर्माण झालेल्या आहेत.
सुख आणि यशाची प्राप्ती शिक्षण आणि कौशल्य यातून मिळते. आज महाराष्ट्रातील युवांसाठी आजची प्रभात ही मंगलप्रभात होत चालली आहे. अनेक देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत चालली असल्याने प्रशिक्षणार्थी युवा खूप कमी सापडतात.

(हेही वाचा : Same Sex Marriage : न्यायालयाचा हा अवमान नाही का?, दिल्लीतील वकिलांच्या वर्तनावर संमिश्र प्रतिक्रिया)

पंतप्रधान पुढे म्हणाले की, १६ देशांमध्ये ४० लाख युवकांना नोकरी मिळू शकते. त्यासाठीत हे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र काम करणार आहे. यामध्ये कन्स्ट्रक्शन सेक्टर, आरोग्य क्षेत्र, ट्रान्सपोर्टेशन क्षेत्र यासह अनेक क्षेत्रांमध्ये परदेशात रोजगाराच्या संधी आहेत.तसेच महाराष्ट्रात मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात मोठ्या संधी आहेत, या कौशल्य केंद्रातून तरुणांना प्रशिक्षण दिलं जाणार असून केंद्रातून सॉफ्ट स्किलवरही फोकस करा, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमला केलं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.