माहिम पश्चिम येथील मोरी रोडला जोडणाऱ्या लेनचे नाव हे सोनावाला अग्यारी रोड असले तरी प्रत्यक्षात या लेनची ओळख आता टँकर गल्ली म्हणूनच मोठ्याप्रमाणात होत आहे. या लेनवर मोठ्याप्रमाणात पारशी समाजाची लोक, वयोवृध्द नागरिक ये-जा करत असतात. पण या रस्त्यावर दोन्ही बाजुंनी टँकर उभे राहत असल्याने या लेनवर चालताना असुरक्षिततेची भावना स्थानिकांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. (Sonawala Agyari Road)
माहिम पश्चिम येथील मोरी रोडला जोडून सोनावाला अग्यारी रोड जात असून या रोडवरच पारशी समाजाची अग्यारी आहे. या अग्यारीमध्ये पारशी समाजाची लोक प्रमाणात असून या लेनवर मोठ्याप्रमाणात रिंगवेल आणि बोअर वेल विविध सोसायट्यांमध्ये बांधण्यात आले आहे. यासर्वं रिंगवेल व बोअरवेलच्या पाण्याची विक्री मोठ्याप्रमाणात होत असल्याने या रस्त्याच्या दुतर्फा पाण्याचे टँकर भरणा केंद्राच्या ठिकाणी उभे केले जाते. मुंबईमध्ये या विहिरींचे पाणी हे पिण्यासाठी वापरले जाऊ नये अशाप्रकारचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाचे असतानाही याठिकाणी उभे असणारे टँकरवर पिण्याचे पाणी असा स्पष्ट उल्लेख दिसून येत आहे. त्यामुळे या विहिरींमधील पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Sonawala Agyari Road)
(हेही वाचा – Shiv Sena UBT : अनिल परब यांच्याकडील विभागप्रमुख पदासाठी ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार ठरणार वारसदार)
या अग्यारी रोडच्या वर वूड लँड सोसायटी, सी ब्रिज, युनियन हाऊस, निल वर्षा, सोनारेस आणि व्यंकटेश प्रसाद या इमारतींमध्ये मोठ्याप्रमाणात विहिरी असून त्यातील पाणी या टँकरद्वारे भरणा करुन विक्री केली जाते. रस्त्यांच्या दोन्ही बाजुला टँकर उभे केल्याने यावरून रात्रीच्या वेळी तसेच दुपारी एकट्या दुकट्याला चालताना असुरक्षिततेची भावना निर्माण होते, तसेच महिलांना या रस्त्यावरुन एकटे चालणेही मुश्किल होऊन जाते असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. शिवाय रात्रभर हे टँकर पाणी भरत असल्याने येथील रहिवाशांची रात्रीही झोपमोड होत असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याची खंत रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे. (Sonawala Agyari Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community