-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने क्षेत्ररक्षण सुधारावं यासाठी संघामध्येच एक स्पर्धा सुरू केली आहे. प्रत्येक सामन्यात चांगला झेल पकडणाऱ्या खेळाडूला बक्षीस मिळतं. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात के एल राहुल आणि जडेजाने पकडलेले झेल स्पर्धेत होते. संघातील खेळाडूंमध्ये चांगली निकोप स्पर्धा असेल तर संघाला चांगली कामगिरी करण्यासाठी त्याचा उपयोगच होतो. भारतीय संघातही तीच वृत्ती सध्या दिसून येत आहे. खास करून क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी संघातील खेळाडूंसाठी सुरेख झेल पकडणाऱ्या खेळाडूसाठी बक्षीस ठेवलं आहे. (Ind vs Ban)
आणि त्याचाच परिणाम असावा, भारतीय खेळाडू झेल टिपण्यासाठी स्वत:ला झोकून देताना दिसतायत. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात तर खेळाडूंमध्ये निकोप चुरस दिसून आली. बांगलादेशच्या मेहदी हसन मिराझला बाद करण्यासाठी यष्टीरक्षक के एल राहुलने त्याच्या डावीकडे झेपावत एकहाती झेल पकडला. राहुल उजव्या हाताने खेळतो. म्हणजेच डावीकडे झुकणं त्याच्यासाठी थोडं अवघड होतं. शिवाय राहुल हा नियमित यष्टीरक्षकही नाही. पण, त्याने हा अप्रतिम झेल टिपला. (Ind vs Ban)
भारताचं क्षेत्ररक्षण या सामन्यातही चांगलंच होतं आणि त्यानंतर बांगलादेश डावातील ४६ वं षटक आलं. जम बसलेला मुश्फिकुर रहिम ३८ धावांवर खेळत होता. त्याने सिराजचा एक चेंडू उंचावर खेळला. पण, रवी जडेजाने उजवीकडे झेपावत रहिमचा झेल बेमालूम पकडला. इथं जडेजा डावखुरा आहे. म्हणजे ही त्याची नेसर्गिक बाजू नाही. पण, जडेजाने झेल पकडला आणि गंमतीने राहुलला आव्हानही दिलं. चांगल्या झेलासाठी ड्रेसिंग रुममध्ये पदक दिलं जातं. त्यामुळे जडेजाने गळ्यात पदक घालत असल्याची नक्कल केली आणि राहुलला हिणवलं. आनंद व्यक्त करताना जडेजाने पहिली मिठी राहुललाच मारली. (Ind vs Ban)
अर्थात, ही स्पर्धा मजेत सुरू होती. त्याला अहमहनिकेचा दर्प नव्हता. (Ind vs Ban)
Jadeja asking for the medal from the fielding coach…!!! pic.twitter.com/udCboRzmRN
— Johns. (@CricCrazyJohns) October 19, 2023
(हेही वाचा – Israel- Palestine Conflict : इस्रायलचे मोठे नुकसान , २०३ लोकांना ठेवले ओलीस तर ३०६ जणांचा मृत्यू)
𝘏𝘶𝘮 𝘶𝘥𝘯𝘢 𝘤𝘩𝘢𝘩𝘵𝘦 𝘩𝘢𝘪…✈️#AmiIndia #INDvBAN #CWC23 #KLRahul #RavindraJadeja pic.twitter.com/3Z6gM3dqQh
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 19, 2023
अचूक गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षकांनी दिलेली साथ याच्या जोरावर भारतीय संघाने बांगलादेशला ५० षटकांत २५६ धावांतच रोखलं. पुण्यातील गहुंजे स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांना साथ देणारी आहे. (Ind vs Ban)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community