Thane Cluster : ठाण्यात क्लस्टर योजनेतून १६००० घरे होणार उपलब्ध, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

या ठिकाणी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.

491
Thane Cluster : ठाण्यात क्लस्टर योजनेतून १६००० घरे होणार उपलब्ध, ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
Thane Cluster : ठाण्यात क्लस्टर योजनेतून १६००० घरे होणार उपलब्ध, ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाणे येथील किसननगर परिसरापाठोपाठ आता शहरातील टेकडी बंगला, हजुरी आणि किसननगरमधील उर्वरित भागात समुह पुनर्विकास (क्लस्टर) योजना परिसरातील ४२.९६ हेक्टर परिसराचा क्लस्टरच्या माध्यमातून विकास करून १६ हजार ५७८ घरे उभारली जाणार आहेत. महाप्रितमार्फत समूह गृहनिर्माण प्रकल्प राबवून त्या माध्यमातून ही परवडणारी घरे बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.या ठिकाणी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. (Thane Cluster)

ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळून जीवितहानी होते. अशा घटना टाळण्यासाठी अनधिकृत आणि अधिकृत इमारतींचा सुनियोजित तसेच संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. रहिवाशांना सध्याचे हक्काचे घर रिकामे न करता नव्याने मोकळ्या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये हक्काचे घर प्राप्त होणार आहे. या क्लस्टर योजनेला पहिल्या टप्प्यात सिडकोच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे.धोकादायक इमारतीतील रहिवाशांना लाभ महाप्रितच्या माध्यमातून टेकडी बंगरा, हाजुरी आणि किसन नगर ५ आणि ६ येथील क्लस्टरसाठी निधी उभा करण्याच्या प्रक्रियेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

या प्रकल्पासाठी ४५ नागरी पुनरुत्थान आराखडे ठाणे महापालिकेने तयार केले होते. त्याचे एकूण क्षेत्रफळ १५०० हेक्टर आहे. पहिल्या टप्प्यात किसननगर भागात सिडकोच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत असून याठिकाणी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना हक्काची आणि मालकी घरे मिळणार आहे.
किसननगर परिसरापाठोपाठ आता शहरातील टेकडी बंगला, हजुरी आणि किसननगरमधील उर्वरित भागात समुह पुनर्विकास (क्लस्टर) योजना राबविण्यात येणार आहे. (Thane Cluster)

(हेही वाचा : Mumbai Bank : मुंबई बँकेला शासकीय बँकिंग व्यवहार करण्याची परवानगीची मागणी)

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्राद्याोगिकी मर्यादित (महाप्रित) या शासकीय कंपनीच्या माध्यमातून येथे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाला अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि नवीन योजना राबविण्यासाठी महाप्रित या सहयोगी कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीमार्फत परवडणारी घरे, शहरी नियोजन, अक्षय ऊर्जा, कृषीमुल्य साखळी, पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यास १० जुलै रोजी मान्यता देण्यात आली आहे. त्याला अनुसरुन ठाणे शहरातील टेकडी बंगला, हजुरी आणि किसननगरमधील उर्वरित भागात समुह विकास प्रकल्प राबविण्यासाठी ठाणे महापालिकेबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.