High Profile Case : हाय प्रोफाइल त्वचातज्ञ डॉ. रुबी टंडन वर गुन्हा दाखल 

186
High Profile Case : हाय प्रोफाइल त्वचातज्ञ डॉ. रुबी टंडन वर गुन्हा दाखल 
High Profile Case : हाय प्रोफाइल त्वचातज्ञ डॉ. रुबी टंडन वर गुन्हा दाखल 
वांद्रे पोलिसांनी बनावट पदवी प्रमाणपत्राचा वापर केल्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या गुन्ह्यात  वांद्रे येथील हाय-प्रोफाइल (High Profile Case) त्वचातज्ञ डॉ. रुबी टंडन यांना समन्स बजावले आहे. डॉ. टंडन यांचे शिफा वेलनेस क्लिनिक 198, लिंकिंग रोड, वांद्रे पश्चिम येथे कार्यरत होते. डॉ. रुबी टंडन ही अभिनेता अमित टंडनची पत्नी असून तिच्याकडे अनेक सेलिब्रिटी त्वचेवर उपचार करण्यासाठी येत असतात.
वांद्रे पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून लेखी तक्रार अर्ज आला होता, या अर्जात डॉ. टंडन यांची पदवी बनावट आहे आणि त्याची चौकशी करणे आवश्यक आहे. पोलिसांनी हे पत्र खारमधील एच/वेस्ट वॉर्डमधील मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक चव्हाण यांना पाठवले. त्यानंतर डॉ.चव्हाण आणि त्यांच्या पथकाने  महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलशी संपर्क साधला.

मनपाला चौकशीत असे आढळून आले की डॉ. टंडन यांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी झालेली नाही. पोलिसांनी मनपाचे  एच पश्चिम  विभागाच्या आरोग्य अधिकाऱ्याला ही माहिती दिली. मनपाच्या तपासादरम्यान डॉ टंडन यांची मुंबईतील महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी नसल्याचे आढळून आले.

(हेही वाचा-Honda CB1000R : होंडाची १५ लाखांची बाईक तुम्ही बघितली का? )

वांद्रे पोलिस ठाण्याचे  निरीक्षक प्रदीप केरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आणि मनपाच्या संयुक्त पथकाने क्लिनिकमध्ये जाऊन डॉ. टंडन आणि त्यांच्या पतीची चौकशी केली. तिचे पदवी प्रमाणपत्र दाखवण्यास सांगितले असता, डॉ. टंडन यांनी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नोंदणी प्रमाणपत्राची रंगीत प्रिंटआउट आणि मेडिकल कौन्सिलचा परवाना सादर केला. या प्रमाणपत्रांवर डॉ रुपिंदर धालीवाल आणि रुपिंदर टंडन जगत धालीवाल यांची नावे होती.
पोलिसांनी प्रमाणपत्रांवर वेगवेगळ्या नावांची चौकशी केली असता, डॉ टंडन यांनी स्पष्ट केले की लग्नापूर्वी तिचे आडनाव धालीवाल होते. प्रमाणपत्र जारी करणार्‍या संस्थेच्या वेबसाइटवर प्रमाणपत्रे तपासल्यावर, मनपा अधिकार्‍यांना जुळणार्‍या नोंदी आढळल्या नाहीत. त्यानंतर डॉ.चव्हाण यांनी वांद्रे पोलिसांकडे रितसर तक्रार दाखल केली. भादवी कलम ४१९, ४२०, ४६५,४६७,४६८,४७१ आणि महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायदा १९६१च्या इतर कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून चौकशीसाठी डॉ. रुबी टंडनला समन्स बजाविण्यात आले आहे.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=Bp4JSaBrLVk

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.