काल म्हणजेच गुरुवार १९ ऑक्टोबर रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात भारताला मोठा धक्का बसला. भारताचा (Hardik Pandya) अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला गोलंदाजी करताना दुखापत झाली. त्याचा घोटा दुखावला असून तो आपले षटक पूर्ण न करताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आता बीसीसीआयने त्याच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे.
बीसीसीआयने सांगितले की, पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बांगलादेश विरुद्ध भारताच्या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) दुखापत झाली. स्कॅनसाठी नेण्यात आले असून त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या सतत देखरेखीखाली असेल. २० ऑक्टोबर रोजी तो संघासोबत धरमशालाला जाणार नाही. आता तो थेट लखनऊ येथे संघात सामील होईल जिथे भारताचा सामना इंग्लंडविरुद्ध आहे.
टीम कॉम्बिनेशन बद्दल बोलायचं झालं तर, शार्दुलला विश्रांती दिली जाऊ शकते आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला खेळवले जाऊ शकते, कारण धर्मशालाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त आहे. (Hardik Pandya) त्याचवेळी हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते.
🚨 NEWS 🚨
Medical Update: Hardik Pandya 🔽 #CWC23 | #TeamIndiahttps://t.co/yiCbi3ng8u
— BCCI (@BCCI) October 20, 2023
दुखापत कशी झाली ?
आठ षटकांपर्यंत जसप्रीत बुमारह आणि मोहम्मद सिराज यांनी बांगलादेशच्या सलामी फलंदाजांना हात उघडून दिले नव्हते. नववे षटक टाकण्यासाठी हार्दिक पांड्या आला. पहिला चेंडू निर्धाव फेकला. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार गेला. तिसरा चेंडू फेकल्यानंतर हार्दिक पांड्याला दुखापत झाली. हार्दिक पांड्या चेंडू अडवण्यासाठी गेला, पण त्याचवेळी त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याला प्रचंड वेदना होत होत्या. फिजिओ तात्काळ मैदानात आले. त्यांनी उपचार केले. हार्दिक पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी गेला. पण त्याची वेदना वाढली. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. हार्दिक पांड्याच्या षटकातील तीन चेंडू टाकण्यासाठी विराट कोहली आला. विराट कोहलीने सहा वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली. विराट कोहलीने तीन चेंडूमध्ये दोन धावा दिल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community