आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांना मोठा दिलासा देण्यासाठी सरकारने मोठे पाऊल आहे. (Free Medicines) कॅन्सर आणि मधुमेहासह अनेक आजारांनी ग्रासलेल्या लोकांना केंद्र सरकार दिलासा देणार आहे. दिल्लीस्थित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये उपचार घेत असलेल्या लोकांसाठीच्या मोफत औषधांच्या यादीत सरकारने ६३ अतिरिक्त औषधांचा समावेश केला आहे. या योजनेअंतर्गत कॅन्सरची महागडी औषधे पालबोसीक्लिब, दसाटिनिब, मेथोट्रेक्झेटही मोफत दिली जाणार आहेत. या निर्णयानंतर उपचारासाठी येणाऱ्या हजारो गरीब रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे एम्सचे संचालक डॉ. एम. श्रीनिवास यांनी सांगितले. (Free Medicines)
(हेही वाचा – Hiranandani On Mahua : महुआ मोईत्रा माझा गैरफायदा घेत होत्या; मात्र माझा नाईलाज होता, दर्शन हिरानंदानींचा दावा)
‘एम्स’ प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेनेरिक फार्मसीची यादी वाढवण्यात आली आहे. यामध्ये कर्करोग, संधीवात, मधुमेह यांसह अनेक आजारांच्या औषधांचा समावेश असून त्यासाठी ३५९ प्रकारची औषधे मोफत दिली जाणार आहेत. (Free Medicines)
रुग्णांसोबत असलेल्या अटेंडंटमुळे एम्समध्ये गर्दी होऊ नये, यासाठीही निर्णय घेण्यात आला आहे. एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव ललवाणी यांनी ओपीडी, लॅब, वॉर्ड आणि इतर ठिकाणी रुग्णासह एकाच अटेंडंटला प्रवेश दिला जाईल, असा आदेश जारी केला आहे. मात्र, हा नियम दिव्यांग, वृद्ध आणि लहान मुलांना लागू होणार नाही. याशिवाय रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना दुपारी ४ ते ६ या वेळेतच परवानगी असणार आहे. (Free Medicines)
हेही पहा –