Mumbai Police : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या अडचणी वाढणार; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

खंडणी प्रकरणात वॉन्टेड असलेला गुंड रवी पुजारीच्या निकटवर्तियाला पोलिसांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली आहे.

204
Mumbai Police : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या अडचणी वाढणार; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
Mumbai Police : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या अडचणी वाढणार; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट याला गुरुवारी अटक करण्यात आली. (Mumbai Police) त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका बिल्डरकडून खंडणी म्हणून 10 कोटी रुपयांची मागणी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. (Mumbai Police)

(हेही वाचा – Cyclone Tej : ‘तेज’ चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकण्याची शक्यता)

कुख्यात गुंड रवी पुजारीच्या निकटवर्तियाला मुंबई पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. खंडणी प्रकरणात वॉन्टेड असलेला गुंड रवी पुजारीच्या निकटवर्तियाला पोलिसांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली, असे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले. देश सोडून पळून गेलेल्या साळवीवर भादंवि आणि मकोका कलम 385 (खंडणी) आणि इतर तरतुदीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या संदर्भात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. (Mumbai Police)

संयुक्त अरब अमिरातीहून विमानाने साळवी विमानतळावर पोहोचला, तेव्हा इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला पकडले आणि ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडे सोपवले, असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळवी खंडणी प्रकरणात वॉन्टेड होता. या प्रकरणात गुंड रवी पुजारीने 2017 मध्ये रोमा बिल्डर्सच्या महेंद्र पमनानीकडून 10 कोटी रुपयांची मागणी केली होती.

‘पुजारीने पमनानी यांना ठार मारण्याची धमकी दिली होती आणि शार्पशूटरना ठाण्यातील बिल्डरच्या कार्यालयात पाठवले होते’, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. साळवी यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Police)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.