आमदार अपात्रतेच्या 34 याचिकांची 6 याचिकांत विभागणी करण्याचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी घेतला आहे. (MLA Disqualification Case) यात 1 ते 16 ठाकरे गटाच्या याचिका आहेत. यात 3 अपक्ष आमदारांच्या याचिका आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे वकील सनी जैन यांनी दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ही 26 ऑक्टोबरला होणार आहे. सनी जैन यांनी आज झालेल्या सुनावणीबद्दल माहिती देतांना सांगितले आहे की, सगळ्या याचिका एकत्रित करण्याची आमची मागणी होती. 30 ऑक्टोबरला विधानसभा अध्यक्षांच्या विरोधातील सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यावर आता बोलू शकत नाही. (MLA Disqualification Case)
(हेही वाचा – Ram Mandir in Ayodhya : अयोध्येतील राममंदिरातील ज्योत देशातील घरोघरी प्रकाश पसरवणार)
आजच्या सुनावणीदरम्यान विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना २५ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिली आहे. सुनावणीदरम्यान शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तीवाद करताना सांगितले की, ठाकरे गटाच्या शिवसेनेने आमदारांना ई-मेलद्वारे जो व्हिप बजावला होता, तो आम्हाला मिळाला नाही. (MLA Disqualification Case)
आजच्या सुनावणीवर बोलताना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब म्हणाले आहेत की, ”सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार गट तयार केले आहे आणि पुढील सुनावणी होईल’, असे अध्यक्ष म्हणाले. शिंदे गटाने दाखल केलेल्या 2 याचिका आणि ठाकरे गटाने दाखल केलेल्या 4 याचिका असे एकूण 6 गट आहेत. आता त्यांना वेळापत्रक दाखल करून सांगायचे आहे की, या सगळ्यावर एकत्रित निर्णय कधी देणार. आमचा म्हणणं आहे की, 2 आठवड्यात यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. 2 अर्ज केले गेले आहेत. एक आमच्या बाजूने आणि 1 त्यांच्या बाजूने. आता कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी 25 तारखेपर्यंत वेळ दिला जाईल, तर 26 तारखेला पुढील सुनावणी होईल.”
विभागणी केलेल्या ६ याचिका
1. पहिल्या मिटींग हजर राहिले नाही.
2. दुसऱ्या मिटींगला उपस्थितीत नव्हते.
3. स्पीकर विरोधात मतदान करणे
4. बहुमत चाचणीमध्ये व्हीप विरोधात मतदान
5. भरत गोगावले यांचा व्हीप मोडला याची याचिका
6. अपक्ष आमदार गट याचिका
या ६ याचिकांमध्ये आता विभागणी करण्यात आली आहे. (MLA Disqualification Case)
हेही पहा –