South Central Railway: वाशिममार्गे नांदेड-मुंबई द्वि साप्ताहिक एक्सप्रेस धावणार, सणावारात प्रवाशांना दिलासा

184
South Central Railway: वाशिममार्गे नांदेड-मुंबई द्वि साप्ताहिक एक्सप्रेस धावणार, सणावारात प्रवाशांना दिलासा
South Central Railway: वाशिममार्गे नांदेड-मुंबई द्वि साप्ताहिक एक्सप्रेस धावणार, सणावारात प्रवाशांना दिलासा

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने (South Central Railway) नांदेड-लोकमान्य टिळक मुंबई विशेष द्वि साप्ताहिक एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-नाशिकसाठी हिंगोली आणि वाशिममार्गे धावणार असल्याने प्रवाशांना दिवाळी सणात दिलासा मिळणार आहे.

दिवाळीपूर्वी रेल्वे सुरू करावी, अशी मागणी वाशिमसह हिंगोली, अकोला जिल्ह्यातून होत होती. या मागणीची दखल घेत दक्षिण मध्य रेल्वेने विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वी रेल्वे सुरू करावी, अशी मागणी वाशिमसह हिंगोली, अकोला जिल्ह्यातून होत होती. त्याची दखल घेत दक्षिण मध्य रेल्वे सुरू करावी, अशी मागणी वाशिमसह हिंगोली, अकोला जिल्ह्यातून होत होती. यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. २० ऑक्टोबरला या गाडीचे वेळापत्रक निश्चित केले आहे.

(हेही वाचा – Twin Tube Tunnel : ठाणे ते बोरिवली आता बोगद्यातून प्रवास; वन्यजीव मंडळाकडून ग्रीन सिग्नल)

त्यानुसार, गाडी क्रमांक ०७४२६ नांदेड ते एलटीटी ही विशेष गाडी२३ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरपर्यंत नांदेड येथून दर मंगळवारी रात्री ९:१५ वाजता सुटून वाशिम येथे मध्यरात्री १ वाजून १४ मिनिटांनी पोहोचून दुसऱ्या दिवशी एलटीटी येथे दुपारी १ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०७४२७ एलटीटी-नांदेड विशेष एक्सप्रेस २४ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत धावेल. एलटीटी येथून दर मंगळवारी दुपारी १६:४० वाजता सुटून वाशिम येथे सकाळी ३:५४ वाजता पोहोचून नांदेड येथे ९:३० वाजता पोहोचेल.

हुजूर साहिब नांदेड-एलटीटी कुर्ला (मुंबई) एक्सप्रेस गाड्यांना पूर्णा, वसमत, हिंगोली, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण स्थानकावर थांबा असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.