ऋजुता लुकतुके
भारत वि. बांगलादेश सामन्यात मेहदी हसनचा यष्टीरक्षक के एल राहुलने पकडलेला झेल सर्वोत्तम की मुश्फिकुर रहिमचा जाडेजाने टिपलेला झेल सरस, अशी चर्चा काल सामन्यानंतर चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर रंगली होती. (Ind vs Ban) अखेर बीसीसीआयनेच त्याचं उत्तर एका बीटीएस व्हीडिओतून दिलं आहे. भारतीय ड्रेसिंग रुममधील हलके फुलके व्हीडिओ बीसीसीआय सोशल मीडियाच्या माध्यमातून अधून मधून प्रसिद्ध करत असते.
कालचा व्हीडिओ होता तो पुण्यात सामन्या नंतर झालेला एक खाजगी पुरस्कार सोहळा. अलीकडे भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारतीय खेळाडूंसाठी प्रत्येक सामन्याच चांगलं क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूसाठी फिल्डर ऑफ द डे पुरस्कार जाहीर केला आहे. भारताच्या प्रत्येक सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक टी दिलिप विजेता घोषित करतात. (Ind vs Ban)
(हेही वाचा – MLA Disqualification Case : 34 याचिकांची 6 याचिकांत विभागणी; आजच्या सुनावणीत काय घडले ?)
यावेळी पुरस्कारासाठी तिहेरी चुरस होती. के एल राहुलने यष्ट्यांच्या मागे मेहदी हसनचा टिपलेला झेल आणि जम बसलेल्या मुश्फिकुर रहिमला बाद करण्यासाठी जाडेजाने मारलेला सूर तसंच मैदानात चौकार रोखण्यासाठी कुलदीप यादवने सातत्याने घेतलेली मेहनत, असे तीन पर्याय टी दिलिप यांच्यासमोर होते. अखेर त्यांनी रवी जाडेजाला हा पुरस्कार दिला. तो क्षण पाहूया… (Ind vs Ban)
The Happiness & Craziness in the dressing room after jadeja winning medal 🏅.
All were celebrated 😂😃.#RavindraJadeja #INDvsBAN #INDvBAN #indiavsbangladesh #BANvIND #Worlds2023 #ICCCricketWorldCup . pic.twitter.com/ie9z5gbfWu— Dil SeCricket (@Crick_Girl) October 20, 2023
सगळे खेळाडू या पुरस्कारासाठी एकत्र जमलेत. मग टी दिलिप यांनी जाडेजाचं नाव घोषित केल आणि या आधीच्या सामन्यात हा पुरस्कार मिळवणारा के एल राहुल त्यानंतर जाडेजाला पुरस्काराचं ते पदक सादर करतो, असा हा व्हीडिओ आहे. पुरस्कारानंतर संघातील इतर सहकारी जाडेजा भोवती जमून त्याचं अभिनंदनही करतात. संघात वातावरण चांगलं आणि स्पर्धात्मक राहावं तसंच खेळाडूंनी क्षेत्ररक्षणावर मेहनत घ्यावी यासाठी हा पुरस्कार मुद्दाम ठेवण्यात आला आहे.
आणि त्याचे सकारात्मक परिणाम संघाच्या क्षेत्ररक्षणावर जाणवत आहेत. कालच्या पुरस्कारासाठी तर खरीखुरी चुरस होती. आणि दोन्ही झेलांची चर्चा क्रिकेट वर्तुळात झाली. आताही जाडेजाला पुरस्कार जाहीर करताना प्रशिक्षक टी दिलिप यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली. ‘पुरस्कार चांगल्या झेलाबरोबरच धावा अडवण्यासाठीही आहे. कारण, वैयक्तिक कामगिरीपेक्षा धावा अडवण्याला संघासाठी जास्त महत्त्व आहे. आणि जाडेजाला पुरस्कार देतानाही तोच विचार झाला आहे,’ असं टी दिलिप म्हणाले.
A grand win 🇮🇳
A grand Medal Ceremony 🏅
A celebration of “Giant” proportions 🔝This time the Dressing room BTS went beyond the boundary – quite literally 😉
The moment you’ve all been waiting for is here 🎬 – By @28anand#TeamIndia | #CWC23 | #INDvBAN
WATCH 🎥🔽
— BCCI (@BCCI) October 20, 2023
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात के एल राहुलला हा पुरस्कार मिळाला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली तर अफगाणिस्तान विरुद्ध शार्दूल ठाकूर या पुरस्काराचे मानकरी ठरले होते. आता भारतीय संघाचा पुढील सामना रविवारी २२ ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध आहे. (Ind vs Ban)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community