त्वचा उजळ, चमकदार होण्यासाठी दह्याचा वापर फायदेशीर ठरतो. यामुळे त्वचा डागविरहित व्हायलाही मदत होते. चेहरा उत्साही, फ्रेश होतो, असे अनेक फायदे सांगता येतील. दह्यासोबत (curd) कोणते पदार्थ (ingredients) चेहऱ्याला (face) लावू शकता , वाचा सविस्तर –
दही आणि हळद (Curd and Turmeric)
दह्यात हळद मिसळून लावल्यास चेहरा उजळायला मदत होते. हळदीत अँण्टी ऑक्सिडेंट्स आणि अँण्टी इंफ्लेमेटरी गुण असतात. ही पेस्ट चेहऱ्याला लावल्याने टॅनिंग कमी होते.
(हेही वाचा – Madras High Court : स्टॅलिन सरकारला फटकारले; रस्त्यावरचा नमाज चालतो, तर संघाचे संचलन का नाही ? )
दही आणि मध (Yogurt and honey)
मध आणि दही एकत्र करून चेहऱ्याला लावावे. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. यामुळे चेहऱ्याला सुदींग इफेक्ट मिळतो. त्वचा मुलायम, मऊ होते.
दही आणि बेसन (curd and gram flour)
दही आणि बेसनाचं मिश्रण त्वचेवर लावल्याने त्वचा एक्सफोलिएट होते. चेहऱ्याचं टॅनिंग निघून जातं. दही आणि बेसनाचा पॅक चेहऱ्याला लावून २० मिनिटांनी चेहरा धुवावा. यामुळे चेहऱ्यावरील मळ निघून जाण्यास मदत होते.
दही आणि टोमॅटो (Yogurt and tomato)
त्वचा उजळ होण्यासाठी, टॅनिंग निघून जाण्यासाठी दही आणि टोमॅटोचा पॅक उत्तम आहे. यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो येतो. याशिवाय आहारातही दह्याचा समावेश केल्यास पोटाचे आरोग्य चांगले राहते.
Join Our WhatsApp Community