Borivali Police : भारतीय बनून परदेशात जाणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा पोलिसांनी लावला छडा

141
Borivali Police : भारतीय बनून परदेशात जाणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा पोलिसांनी लावला छडा
Borivali Police : भारतीय बनून परदेशात जाणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा पोलिसांनी लावला छडा

भारतीय नागरिक असल्याची बोगस कागदपत्रे तयार करून बांगलादेशी नागरिकांना परदेशात पाठवणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांना यश आले. बोरिवली पोलिसांनी (Borivali Police) एका बांगलादेशी (Bangladeshi) एजंटसह १७ घुसखोर बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रासह मुंबईतून अटक करण्यात आली आहे. हे घूसखोर बांगलादेशी भारतीय (Indians were discovered ) बनून परदेशात जाण्याच्या तयारीत होते, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

भारतात बांगलादेशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घूसखोरी केली आहे. स्वतःचे नाव बदलून, बोगस सरकारी दस्तावेज तयार करून हे घूसखोर देशातील बड्या शहरात नोकरी धंद्यासाठी येऊन तिथेच स्थायिक होत आहे.मुंबईसह नजीकच्या शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी बांगलादेशी नागरिक बोगस सरकारी दस्तावेज तयार करून काम करीत आहे. या बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या भारतात आणण्यासाठी मोठ्या टोळ्या कार्यरत आहेत. या टोळ्या मानवी तस्करीमध्ये गुंतल्या आहेत. मुंबईसह इतर शहरात या टोळ्या कार्यरत असून या टोळ्यांचे कनेक्शन थेट बांगलादेशी टोळ्यांशी आहे.

(हेही वाचा – Banner Free Mumbai : चला करुया मुंबईला विद्रुप : शिवसेना, भाजप आणि मनसेचा मंत्र)

मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी मजुरांची मागणी बघून या टोळ्या बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात मजूरांची तस्करी भारतात करीत आहे. या टोळ्या बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या भारतात आणून त्यांची बोगस कागदपत्रे तयार करून ते भारतीय असल्याचे भासवून त्यांना बांधकामाच्या ठिकाणी कामाला ठेवतात. या तस्करांना या कामाचा मोठा मोबदला मिळत आहे.

मुंबईसह भारताच्या बाहेर परदेशात बांगला देशी यांची तस्करी सुरू करण्यात आली आहे. भारतीय असल्याचे बोगस कागदपत्रे तयार करून बांगलादेशी यांना मंजुरीसाठी कुवेत, दुबई येथे भारतीय बनवून पाठवले जात आहे. बोरिवली पोलिसांनी या प्रकरणी एक टोळीचा पर्दाफाश करून ३ बांगलादेशी एजंटसह १७ घूसखोर बांगलादेशी यांना अटक करण्यात आली. बोरिवली पोलिसांनी या १७ जणांकडून बोगस पॅनकार्ड, आधारकार्ड, तसेच भारतीय असल्याचे खोटे पुरावे जप्त करण्यात आले आहे.

या मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांनी यापूर्वी मोठ्या प्रमाणात बोगस कागदपत्रे तयार करून घुसखोर बांग्लादेशी नागरिकांना भारतीय असल्याचे भासवुन परदेशात पाठविण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून लवकरच इतर बांगलादेशी मानवी तस्करीच्या टोळ्यांचा पर्दाफाश करण्यात येईल, असे पोलीस अधिकारी यांनी म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.