ठाकरे गटाचे नेते रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेने (Offenses Branch) समन्स बजावलं असून त्यांना २३ ऑक्टोबरला ११ वाजता पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
५०० कोटींच्या कथित हॉटेल घोटाळाप्रकरणी रवींद्र वायकर यांना हे समन्स बजावण्यात आलं आहे. जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी रवींद्र वायकर यांच्यावर सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणामध्ये रवींद्र वायकर यांनी आधीच कोर्टाकडून अटकपूर्व जामीन घेतला आहे. या प्रकरणात इतरही काही आरोपींचा समावेश आहे. त्यांच्यावरदेखील कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(हेही वाचा – High court : हायकोर्टाच्या ११२ न्यायाधीशांची नियुक्ती रद्द, नेमके काय आहे कारण?)
मला कोणतीही नोटीस आली नाही, तरीही कोणत्याही प्रकारचं समन्स किंवा नोटीस बजावण्यात आली, तर चौकशीसाठी हजर राहणार असल्याची तयारी असल्याची माहिती रवींद्र वायकर यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community