Ind vs Nzl : रोहित शर्मा युवा शुभमन गिलला देतोय न्यूझीलंड विरुद्ध जिंकण्याचा मंत्र

रविवारी २२ ऑक्टोबरला संघाची गाठ आणखी एका अपराजित संघाशी आहे.

79
Ind vs Nzl : रोहित शर्मा युवा शुभमन गिलला देतोय न्यूझीलंड विरुद्ध जिंकण्याचा मंत्र
Ind vs Nzl : रोहित शर्मा युवा शुभमन गिलला देतोय न्यूझीलंड विरुद्ध जिंकण्याचा मंत्र
  • ऋजुता लुकतुके

आतापर्यंत स्पर्धेतील सलग चार सामने जिंकलेला भारतीय संघ आता तुल्यबळ प्रतिस्पर्धी न्यूझीलंडशी दोन हात करणार आहे. २००३ पासून आयसीसी स्पर्धेत भारताला न्यूझीलंड (Ind vs Nzl) विरुद्ध जिंकता आलेलं नाही. पण, यावेळी विजय मिळवण्याचा मंत्र कर्णधार रोहीत शर्माकडे आहे. आणि तो शुभमनला देतानाचा व्हीडिओ सध्या व्हायरल झालाय.

भारतीय संघाने आतापर्यंत या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश विरुद्ध दमदार विजय मिळवले आहेत. पण, रविवारी २२ ऑक्टोबरला संघाची गाठ आणखी एका अपराजित संघाशी आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ धरमशाला इथं आमने सामने येणार आहेत. शिवाय २००३ पासून एकदाही आयसीसीच्या स्पर्धेत भारताने न्यूझीलंडला हरवलेलं नाही. हा काळा डागही भारताला सतावतोय.

अशावेळी भारतीय कर्णधार रोहीत शर्मा मात्र याची फारशी काळजी करताना दिसत नाही. युवा फलंदाज आणि त्याचा सलामीचा साथीदार शुभमन गिल सोबत रोहीत शर्मा गप्पा मारतानाचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. बीसीसीआयनेच तो आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केलाय.

आणि या व्हीडिओत रोहीत शर्मा शुभमनला न्यूझीलंड विरुद्ध जिंकण्याचा मंत्रच सांगतो आहे.

ब्लॅककॅप्स (न्यूझीलंड संघाचं एक नाव) आपण २००३ पासून जिंकलेलो नाही. ही एक नकोशी वाटणारी आकडेवारी आहे. पण, त्यावरून काळजी करण्यासारखं काही नाही, असं रोहीत या व्हीडिओत शुभमनला सांगतोय. ‘हम चारमें से चार जीत गए. आता पुढच्या सामन्यातही सर्वोत्तम खेळ केला. तर आपणच जिंकू. न घाबरता फलंदाजी करणं महत्त्वाचं,’ असं रोहीत इथं म्हणताना दिसतोय.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.