Aus vs Pak : दक्ष पोलिसामुळे बंगळुरूच्या मैदानावरील ‘हा’ प्रसंग टळला

शुक्रवारी २० ऑक्टोबरला हा सामना झाला.

99
Aus vs Pak : दक्ष पोलिसामुळे बंगळुरूच्या मैदानावरील ‘हा’ प्रसंग टळला
Aus vs Pak : दक्ष पोलिसामुळे बंगळुरूच्या मैदानावरील ‘हा’ प्रसंग टळला
  • ऋजुता लुकतुके

बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानात एका पोलिसाने हस्तक्षेप करून पाक समर्थकांकडून सगळी पोस्टर काढून घेतली. काय होतं या पोस्टरवर?

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानचा (Aus vs Pak ) सामना सुरू असताना प्रेक्षकांच्या गॅलरीत एका वेगळाच प्रसंग काही काळासाठी घडला. शुक्रवारी २० ऑक्टोबरला हा सामना झाला. आणि इथं काही प्रेक्षकांना आवरण्यासाठी एका पोलिसाला कडक धोरण अवलंबावं लागलं. सोशल मीडियावर या दक्ष पोलिसाचं कौतुकही होतंय.

काही प्रेक्षक मैदानात पाक संघाच्या समर्थनार्थ आणि त्यांना विरोध करणाऱ्यांच्या निषेधार्थ काळे कपडे घालून मैदानात आले होते. ते पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत होते. आणि त्यांच्याकडे कथितरीत्या आक्षेपार्ह घोषणा फलकही होते.

(हेही वाचा – Dadar Fire : दादरमधील कीर्तिकर मार्केटजवळ पहाटे भीषण आग, जीवितहानी टळली)

एका व्हायरल झालेल्या व्हीडिओत एक पोलीस शिपाई या लोकांना काळे कपडे का घातले, असं विचारतो आहे. आणि त्यांच्याकडचे फलक काढून घेताना दिसतो आहे.

Insert tweet – https://twitter.com/Srivatsa_Tweetz/status/1715364559417115027?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1715364559417115027%7Ctwgr%5Edc33cf5b99be5571b26479a3ad87cf14b2a406fc%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Ftimesofindia.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Ficc-world-cup%2Fnews%2Faustralia-vs-pakistan-police-keep-strict-vigil-as-fans-barred-from-displaying-provocative-posters-or-shouting-slogans%2Farticleshow%2F104590110.cms

‘प्रेक्षक मैदानात येताना त्यांच्याकडचे फलक तपासण्याचे निर्देशच आम्हाला देण्यात आले होते. त्यात कुठल्याही प्रकारचा धार्मिक संदेश नसावा असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. किंवा धार्मिक घोषणा देण्यावरही मनाई होती,’ असं मैदानाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या अधिकाऱ्याने पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

तर बंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त बी दयानंद यांनीही पोलीस अधिकाऱ्यांना घोषणा व फलकांवर लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं. ‘अलीकडे शहरात पॅलेस्टिनच्या समर्थनार्थ दोन मोर्चे निघाले होते. त्यामुळे क्रिकेट सामन्या दरम्यानही असे कुठल्या प्रकारचे प्रसंग ओढवू नये यासाठी आम्ही दक्ष होतो. इतर प्रेक्षकांना त्रास होईल अशा कुठल्याही जातीवाचक, धर्मवाचक घोषणा नकोत, असे निर्देश आम्हाला होते,’ असं दयानंद पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

सामन्यानंतर लगेचच एक व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला.

या व्हीडिओत पोलीस प्रेक्षकांना काही घोषणा करण्यापासून थांबवत आहे. प्रेक्षक पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत असल्याचं या पोलिसाचं म्हणणं होतं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.