ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर (World Cup 2023) यांनी शतकं झळकावली. आणि त्याच्या जोरावर संघाने ३६८ धावांचा डोंगर रचला, आणि पाकिस्तानलाही ६८ धावांनी हरवलं. भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जिव्हारी लागणाऱ्या पराभवांनंतर ऑस्ट्रेलियासाठी हा विजय नक्कीच महत्त्वाचा होता. शिवाय या विजयामुळे गुणतालिकेत त्यांनी पाकिस्तानला मागे टाकून चौथं स्थान मिळवलं आहे.
तर पाकिस्तानचा (World Cup 2023) संघ आता पाचव्या स्थानावर गेला आहे.
एकंदरीतच यंदाच्या स्पर्धेत गुणतालिकेत मोठी चुरस दिसून येत आहे. स्पर्धेचा पहिला टप्पा (World Cup 2023) या आठवडयात संपतोय. आणि गुणतालिका रंगतदार अवस्थेत आहे. इंग्लंड हा गतविजेता संघ आश्चर्यकारकरित्या दोन पराभवांनंतर सहाव्या स्थानावर फेकला गेलाय.
(हेही वाचा – RBI Governor on Crypto : आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा क्रिप्टोला विरोध कायम)
रविवारी भारत आणि न्यूझीलंड (World Cup 2023) दरम्यानची लढतही रंगतदार असणार आहे. कारण, आतापर्यंत अपराजीत असलेले हे दोन्ही संघ विजयाबरोबरच गुणतालिकेत आघाडीसाठीही लढतील. हा सामनाच मूळात वर्चस्वाची लढाई म्हणून पाहिला जातोय.
त्याचबरोबर २००६ मध्ये ही स्पर्धा जिंकलेला श्रीलंकेचा संघ नेदरलँड्स (World Cup 2023) आणि अफगाणिस्तानच्याही खाली तळाला आहे. त्यांना नेदरलँड्स विरुद्ध मोठा विजय मिळवून गुणतालिकेत वर येण्यासाठी झगडावं लागणार आहे. तर पाकिस्तानने चांगल्या सुरुवातीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचे सामने गमावल्यामुळे त्यांचीही पिछेहाट झालीय. दक्षिण आफ्रिकन संघालाही नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. त्यांचीही इच्छा असेल ते पुढे जाण्याची.
एकंदरीत स्पर्धेतला दुसरा टप्पा हा रंजक होत जाणार आहे. आणि दर सामन्यागणिक गुणतालिकेत बदल होत जाणार आहेत. (World Cup 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community