MHT CET Exam: महाराष्ट्र सीईटी २०२४ चे वेळापत्रक जाहीर

167
CET Exam: महाराष्ट्र सीईटी २०२४ चे वेळापत्रक जाहीर
CET Exam: महाराष्ट्र सीईटी २०२४ चे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य समायिक प्रवेश परीक्षा (CET)सेलने MBA CET आणि इतर CET परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भात याबाबत माहिती मिळू शकते.

MAH MBA CET, MMS CET, MAH MCA CET, MHT CET, MAH LLB 5 Years CET, MAH B.Ed CET, MAH BHMCT CET, MAH BPlanning CET, MAH MPEd या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. MH Common Entrance Test ने जाहीर केल्या प्रमाणे या परीक्षा मार्च २०२४ ते मे २०२४ या कलावधीत घेण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – RAJ THAKREY : शहरं सुंदर दिसण्यासाठी मुळात सौंदर्यदृष्टी सत्तेत असायला पाहिजे, राज ठाकरेंची टीका )

MHT CET 2024 च्या परीक्षा १६ एप्रिल ते ५ मे दरम्यान घेण्यात येणार आहेत. तर, MAH MBA आणि MMS CET २४ मार्च रोजी होणार आहे. तर, MAH MCA CET च्या परीक्षा ३० मार्च रोजी होणार आहे. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार पूर्ण वेळापत्रक तपासू शकतात.

परीक्षेचे वेळापत्रक येथे पहा :
– MAH-B.Ed M.Ed, तीन वर्षांचा इंटीग्रेटेड अभ्यासक्रम : २ मार्च
– MAH-MED CET : २ मार्च
– MAH-MPed CET : ९ मार्च फील्ड टेस्ट: १० ते ११ मार्च
– MAH-LLB ३ वर्षीय CET : ११ ते १३ मार्च
– MAH-BPed-CET : १५ मार्च मैदानी चाचणी : १६ ते १८ मार्च

– MAH-B.Ed (सामान्य आणि विशेष) आणि B.Ed ELCT-CET:१८ ते २१ मार्च
– MAH- MBA/MMS-CET : २३ ते २४ मार्च
– MAH-MCA CET : ३० मार्च
– MAH-BDesign CET : ६ एप्रिल
– mah-mar cet : ७ एप्रिल
– MAH-MHMCT CET : ७ एप्रिल
– MAH-BHMCT CET : १३ एप्रिल
– MAH-BPlanning CET : १३ एप्रिल
– MHTCET : १६ एप्रिल ते २ मे
– MAH-BA/BSc B.Ed (चार वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम) CET : ६ मे
– MAH- L.L.B. 5 Years CET : ७ ते ८ मे
– MAH-B.Sc. Nursing CET : ९ ते १० मे

जानेवारी महिन्यात या परीक्षेसाठी अधिकृत नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी, उमेदवार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील असे सांगण्यात येत आहे, तर परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या किमान एक आठवडा आधी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. त्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन डाउनलोड करू शकतील. त्याचबरोबर मे-जूनमध्ये सर्व परीक्षांचे निकाल जाहीर केले जातील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.