CM Eknath Shinde : श्री ब्राम्हणदेव कृपा इमारतीतील १७५ कुटुंबांना मिळणार दिलासा

रहिवाशांच्या विनंतीला मान देत मुख्यमंत्री शिंदे यांनी या इमारतीची जाऊन पाहणी केली.

156
CM Eknath Shinde : श्री ब्राम्हणदेव कृपा इमारतीतील १७५ कुटुंबांना मिळणार दिलासा
CM Eknath Shinde : श्री ब्राम्हणदेव कृपा इमारतीतील १७५ कुटुंबांना मिळणार दिलासा

माहीम परिसरातील श्री ब्राम्हणदेव कृपा सोसायटीतील रहिवाशांनी शनिवारी (२१ ऑक्टोबर) सकाळी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्याना आपल्या इमारतीची पाहणी करण्याची विनंती केली. रहिवाशांच्या विनंतीला मान देत मुख्यमंत्री शिंदे यांनी या इमारतीची जाऊन पाहणी केली. यावेळी इथे मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या पुनर्विकास कामामुळे स्थानिक रहिवाशांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन या ठिकाणी तत्काळ बैठक घेऊन या इमारतीचा एकत्रित पुनर्विकास करण्याबाबत बैठक घेण्याचे निर्देश शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (CM Eknath Shinde)

New Project 2023 10 21T144609.534

मुख्यमंत्री शिंदे हे आज सकाळी माहीम येथे शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या कुटूंबात एक दुःखद प्रसंग घडल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांना धीर देण्यासाठी गेले होते. यावेळी सरवणकर कुटूंबाची भेट घेतल्यानंतर गाडीपाशी आले असता श्री ब्राम्हणदेव कृपा सोसायटीमधील सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या इमारतीपाशी चालू असलेल्या पुनर्विकासाच्या कामाची पाहणी करण्याची विनंती केली. यावेळी या इमारतीला लागून असलेल्या इमारतीच्या पूर्णविकास नियमबाह्यरित्या सुरू असल्यामुळे आधिच धोकादायक बनलेल्या या इमारतीमध्ये स्लॅब कोसळणे, इमारतीला तडे जाण्याचे प्रकार सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र याबाबत वारंवार तक्रार करूनही संबंधित विकासक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे या रहिवाशांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – RAJ THAKREY : शहरं सुंदर दिसण्यासाठी मुळात सौंदर्यदृष्टी सत्तेत असायला पाहिजे, राज ठाकरेंची टीका)

New Project 2023 10 21T144708.540

श्री ब्राम्हणदेव कृपा ही इमारत ४० ते ४२ वर्षे जुनी असून त्यात १७५ कुटूंब राहतात. जेव्हा या इमारतीचा काही वर्षांपूर्वी पुनर्विकास झाला तेव्हा भाड्याने राहणारे आणि विक्री केलेल्या अशा दोन इमारती याठिकाणी उभ्या राहिल्या. या दोन्ही इमारतींचा प्लॉट एकच असल्याने विक्री झालेल्या इमारतीसोबतच भाड्याने राहणाऱ्या रहिवाशांचे एकत्रित पुनर्विकास होणे गरजेचे होते तरीही विकासकाने फक्त विक्री झालेल्या इमारतीचे पुनर्विकासाचे काम मनमानी पध्दतीने काम सूरु केले. या कामामुळे बाजूच्या रहिवाशांना प्रचंड त्रास होत असूनही सदर विकासकाने त्याकडे डोळेझाक केल्याचे स्थानिक रहिवाशांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. (CM Eknath Shinde)

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची तत्काळ दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याना फोन करून श्री ब्राम्हणदेव कृपा सोसायटीचा एकत्रित पुनर्विकास करण्याबाबत बैठक घेऊन लवकरात लवकर तसा निर्णय करावा असे निर्देश दिले. तसेच तोपर्यंत सदर इमारतीचे बांधकाम तत्काळ थांबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तसेच स्थानिक आमदार सदा सरवणकर आणि सोसायटीतील रहिवाशांशी चर्चा करून यातून तत्काळ मार्ग काढावा असेही सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ आपली दखल घेऊन आपल्याला दिलासा दिल्यामुळे श्री ब्राम्हणदेव कृपा सोसायटीमधील रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांचे तसेच स्थानिक आमदार सदा सरवणकर यांचे आभार मानले. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.