स्वातंत्र्यानंतर भारतीय सेनेची रचना कशी असावी, याविषयी तेव्हाचे सेनादलप्रमुख जनरल थिमय्या यांनी एक योजना पंतप्रधान नेहरू यांच्यासमोर ठेवली. तेव्हा पंतप्रधान नेहरू संतापले. अहिंसा हे आपले तत्त्व आहे, आपल्याला आपल्या शेजारी देशांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करायचे आहेत. ते राजनैतिक स्तरावरच रहावेत, अशी नेहरूंची इच्छा होती. पंतप्रधान नेहरूंची अशी घातक मानसिकता होती, असे परखड उद्गार ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी काढले. ते ‘सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटर’ने आयोजित केलेल्या ‘पाकिस्तान्स रेप ऑफ काश्मीर’ या कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम २१ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे पार पडला. या वेळी ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर काश्मीरमध्ये झालेल्या लष्करी कारवाया, सरकारची भारतीय सेनादलाविषयीची धोरणे यांविषयी उपस्थितांना अवगत केले.
(हेही वाचा – Electricity News : वीज ग्राहकांना मिळणार प्रीपेड स्मार्ट मीटर)
नेहरूंचा देशविघातक निर्णय !
भारतीय स्वातंत्र्याच्या काळात काश्मीरमध्ये फारसे रस्ते नव्हते. एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात जाण्यासाठी एकच वाट होती. त्या वेळी एकच पर्यायी वाट होती, हाजी पीर पास ! तेव्हा 1948 मध्ये झालेल्या युद्धात हाजी पीर पासचा परिसर नेहरूंनी पाकिस्तानला देऊ केला. 1965 च्या युद्धात भारतीय सेनेने ते स्थान पुन्हा मिळवले. हे भारतीय सेनेचे त्या युद्धातील मोठे यश आहे !
1948 च्या युद्धात पाकच्या कारवाया वाढू लागल्यानंतर भारतीय सेनाप्रमुखांनी नेहरूंना सांगितले की, पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे, प्रतीआक्रमण करणे ! तेव्हा नेहरू म्हणाले, ‘याविषयी संसदेत प्रस्ताव मांडला पाहिजे.’ त्याच वेळी लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय सेनेला आक्रमण करण्याचे अधिकार दिले आणि भारतीय सेनेने शौर्य गाजवून पाकच्या सेनेची पीछेहाट केली. जम्मू काश्मीर संस्थान भारतात विलिन करण्याच्या वेळी भारतीय सेना जम्मू काश्मीर मध्ये गेल्या, तेव्हा पंतप्रधान असलेल्या नेहरूंनी विचारले की, एवढ्या क्षमतेचा दारुगोळा का वापरला जात आहे ? नेहरूंना आपल्या शत्रू देशासोबत कथित मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करायचे होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची दूरदृष्टी !
वर्ष 1944 मध्ये देशात ब्रिटिशांचे राज्य होते. त्या वेळी भारतात असलेले ब्रिटिश सैन्य ब्रिटनमध्ये असलेल्या सैन्यापेक्षा जास्त होते. खरे तर तेव्हा इंग्रजांचे म्हणजे शत्रूचे राज्य होते. त्यामुळे भारतियांचे सैन्यात भरती होण्याचे प्रमाण खूप कमी होते. त्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या जागृतीमुळे सैन्यात सहभागी होणाऱ्या भारतियांचे प्रमाण वाढले. याचा फायदा पुढे 1948 मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या युद्धाच्या वेळी झाला.
भारतीय सेना श्रीनगरमध्ये उतरली तो दिवस 27 ऑक्टोबर !
काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणे हे त्या वेळी इतके सोपे नव्हते. भारत स्वतंत्र झाला, तेव्हा काश्मीर भारतात सामील झाले नव्हते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 26 ऑक्टोबर 1947 ला काश्मीरचे महाराज हरिसिंह यांनी भारत सरकारकडे पाकिस्तानी सेनेशी लढण्यासाठी सैनिकी मदत मागितली. त्यानंतर 27 ऑक्टोबर 1947 रोजी भारतीय सेना प्रथम श्रीनगरमध्ये उतरली. हा दिवस भारतीय पायदळ दिन म्हणून ओळखला जातो.
ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी यावेळी काश्मीरसाठी आतापर्यंत झालेली युद्ध, त्या वेळी भारतीय सेनेने गाजवलेले शौर्य आणि नेहरूंची धक्कादायक धोरणे यांविषयी माहिती दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community