Ind vs Nz : वर्चस्वाची ही लढाई भारताला जिंकता येईल का?

दोन्ही संघ आतापर्यंत स्पर्धेत अपराजित आहेत. इतकंच नाही तर त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर पूर्ण वर्चस्व गाजवलंय.

158
Ind vs Nz : वर्चस्वाची ही लढाई भारताला जिंकता येईल का?
Ind vs Nz : वर्चस्वाची ही लढाई भारताला जिंकता येईल का?
  • ऋजुता लुकतुके

दोन्ही संघ आतापर्यंत स्पर्धेत अपराजित आहेत. इतकंच नाही तर त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर पूर्ण वर्चस्व गाजवलंय. आता या दोघांमधील लढतीत कोण वर्चस्व गाजवतं याची उत्सुकता सर्वांनाच आहे. इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफर्डवर २०१९ मध्ये भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा सामना आठवतोय? (Ind vs Nz)

विश्वचषक स्पर्धेचा तो उपान्त्य फेरीचा सामना होता. भारतीय संघ चांगलाच फॉर्मात होता. रोहीत शर्माने स्पर्धेत तोपर्यंत पाच शतकं ठोकली होती आणि के एल राहुल, रोहीत शर्मा, विराट कोहली ते धोनी आणि जडेजा अशा आठव्या क्रमांकापर्यंत पसरलेली भारतीय फलंदाजी या सामन्यातही कागदावर मजबूत वाटत होती. (Ind vs Nz)

प्रत्यक्षात २४० धावांचा पाठलाग करताना रोहीत, राहुल आणि विराट प्रत्येकी एक धाव करून बाद झाले आणि पुढे ९६ धावांमध्ये सहा फलंदाज माघारी परतलेले होते. हार्दिक पांड्याने ३२ आणि धोनी, जडेजाने अर्धशतकं करून भारतीय डाव चांगलाच सावरला. सामन्यात रंगत निर्माण केली. तरी संघाला १८ धावा कमी पडल्या. (Ind vs Nz)

मधल्या फळीने इतका जोर लावूनही झालेला हा पराभव जिव्हारी लागणारा होता. भारताची विश्वचषक जिंकण्याची संधीही त्यामुळे हुकली. पुढच्याच वर्षी साऊदॅम्पटनमध्ये हेच संघ कसोटी विश्वविजेतेपदासाठी आमने सामने आले. पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी बहरेल अशीच अपेक्षा होती. पण, कसोटी विजेतेपदाचं स्वप्न भारतापासून न्यूझीलंडने हिरावून घेतलं. (Ind vs Nz)

हे अलीकडच्या चार वर्षातील अनुभव आहेत. पण, वस्तुस्थिती ही आहे की २००३ पासून भारतीय संघ आयसीसीने आयोजित केलेल्या एकही स्पर्धेत न्यूझीलंडवर विजयम मिळवू शकलेला नाही. ही गोष्ट रोहीत शर्माच्या या संघाला नक्कीच सलत असणार. कारण, फक्त कागदावरच नाही तर आपल्या कामगिरीने या संघाने विश्वचषकापूर्वी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवला आहे. (Ind vs Nz)

आणि या विश्वचषकात भारतीय संघाचा विजयी वारू पुन्हा एकदा न्यूझीलंडने रोखलेला संघाला नक्कीच आवडणार नाही. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघही चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. आणि त्यांनीही गतविजेते इंग्लंड आणि इतर तीन संघांवर निर्णायक तसंच मोठे विजय मिळवून स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहण्याचा मान मिळवला आहे. (Ind vs Nz)

त्यामुळे रविवारी दुपारी दोन वाजता हे दोन संघ धरमशाला इथं आमने सामने येतील तेव्हा ही दोन तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांची वर्चस्वाची लढाई असेल. भारतासाठी दोन जमेच्या बाजू असतील. एक म्हणजे सामना भारतात होतोय आणि भारताने आधी मिळवलेले विजय हे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान सारख्या तगड्या संघांबरोबर दुसरी फलंदाजी करून मिळवलेले आहेत. आणि त्यांनी या दोन तगड्या संघांना दोनशेच्या आत रोखण्याची कामगिरीही केलीय. (Ind vs Nz)

तर न्यूझीलंडचा इंग्लंड विरुद्धचा विजय सोडला तर इतर तीन विजय नेदरलँड्स, अफगाणिस्तान आणि बांगलादेश विरुद्धचे आहेत. आणि धरमशालामध्ये किवी फलंदाज डेव्हिड कॉनवे आणि टॉम लिथम जसप्रीत बुमरा, सिराज आणि कुलदीप, जाडेजा यांचा कसा सामना करतात यावर सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे. अशा या सामन्यात दोन्ही संघांसमोरची आव्हानं आणि खेळपट्टी, हवामान याचा आढावा घेऊया… (Ind vs Nz)

हार्दिकची दुखापत भारतासाठी कसोटी

हार्दिक पांड्या धरमशालामध्ये खेळणार नाही हे निश्चित आहे. तो उपचारासाठी बंगळुरूला रवाना झाला आहे. आता प्रश्न आहे हार्दिकची जागा कोण घेणार? हा प्रश्न खुप मोठा आहे. कारण, हार्दिक संघातला सहाव्या क्रमांकावर येणारा तडाखेबंद फलंदाज होता आणि दहा मध्यमगती षटकं हमखास टाकू शकेल असा गोलंदाज होता आणि त्याच्या मागे अशी दुहेरी भूमिका बजावेल असा खेळाडू भारतीय संघात नाही. (Ind vs Nz)

अश्विन, महम्मद शामी आणि सुर्यकुमार यादव हे सगळे पर्याय तगडे आहेत. पण, त्यांची भूमिका अष्टपैलू नाही. त्यामुळे हार्दिकच्या नसण्याने भारतीय संघासमोर निवडीचा प्रश्नच उभा राहिला आहे. (Ind vs Nz)

अशावेळी सुर्यकुमार यादव या तज्ज फलंदाजाचा समावेश करून शार्दूल ऐवजी महम्मद शामीच्या समावेशाचा विचार भारतीय गोटात सुरू आहे. सुर्यकुमारमुळे फलंदाजीची ताकद वाढते. तर शार्दूल ऐवजी शामी संघात आला तर धरमशालाच्या स्विंगला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर तो जास्त प्रभावी ठरू शकतो. याशिवाय अश्विनच्या नावाचा विचारही संघ प्रशासनाकडून सुरू आहे. पण, धरमशालाच्या खेळपट्टीवर फिरकी कितपत प्रभावी ठरेल हा प्रश्नच आहे. थोडक्यात हार्दिकच्या दुखापतीमुळे निर्माण झालेल्या संघरचनेविषयीचा तिढा भारताला लवकरात लवकर सोडवावा लागणार आहे. (Ind vs Nz)

न्यूझीलंडला चिंता दुखापतीची

न्यूझीलंड संघाचाही जम चांगलाच बसलेला आहे. पण, केन विल्यमसन या सामन्यातही खेळणार नाहीए. त्यामुळे डेव्हिड कॉनवे, रवींद्र, विल यंग आणि डेरिल मिचेल यांना फलंदाजीची धुरा वाहावी लागणार आहे. तर नवोदित कर्णधार टॉम लॅथमलाही मोठी जबाबदारी पार पाडायची आहे. भारताविरुद्ध लॅथमची फलंदाजी नेहमीच बहरते. (Ind vs Nz)

पण, इथं भारताविरुद्ध भारतीय वातावरणात खेळताना त्याची कर्णधार म्हणून नक्कीच कसोटी लागणार आहे. न्यूझीलंडची खरी कसोटी भारताला भारतात हरवण्याचीच आहे. (Ind vs Nz)

(हेही वाचा – Government Hospital : एका क्लिकवर मिळणार राज्यातील रुग्णांची माहिती)

खेळपट्टी आणि हवामान

धरमशालाला झालेल्या आधीच्या तीनही सामन्यांत खेळपट्टीने गोलंदाजांना आणि खासकरून स्विंग गोलंदाजीला मदत केलेली आहे. आणि तीन पैकी दोन सामने पहिली फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. मात्र आघाडीच्या फलंदाजांनी आपले फटके खेळण्याची घाई केली तर या खेळपट्टीने त्यांना धडाही शिकवला आहे. त्यामुळे खेळपट्टी समजून घेऊन तिचा मान ठेवून खेळणं ही इथे खेळण्याची योग्य पद्धत आहे. (Ind vs Nz)

रविवारी दोन्ही संघांना याचं भान ठेवावं लागेल. बाकी खेळपट्टी हळू हळू फलंदाजांना चांगली साथ देते. आऊटफिल्ड काहीसं संथ असल्यामुळे इथं धावा तीनशेच्या वर होण्याची शक्यता थोडी कमीच आहे. (Ind vs Nz)

आता धरमशालामध्ये हळू हळू थंडी पडायलाही सुरुवात झाली आहे आणि आधीच्या सामन्यात पावसाने त्रास दिला असला तरी रविवारी पावसाची शक्यता फारशी नाही. १९ अंश सेल्सिअस इतकं तापमान संध्याकाळी असेल आणि वातावरण ढगाळ असेल असा अंदाज आहे. (Ind vs Nz)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.