UP ATS – दहशदवाद्यांशी दोन हात करण्यासाठी भारतीय महिला सज्ज

एके-47 सारखी आधुनिक शस्त्रे हाताळणार

114
UP ATS - दहशदवाद्यांशी दोन हात करण्यासाठी भारतीय महिला सज्ज

देशाच्या सुरक्षेसाठी आणि दहशतवादी घटनांचा (UP ATS) सामना करण्यासाठी उत्तर प्रदेशात देशातील पहिली महिला कमांडो बटालियन तयार केली जात आहे. उत्तर प्रदेश येथे देशातील पहिले महिला कमांडो युनिट तयार केले जात आहे.

दहशतवादी घटनांचा (UP ATS) सामना करण्यासाठी कमांडो टीममध्ये महिलांचे विशेष पथक तयार करण्यात आलेले उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य असेल. या महिला कमांडो कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असतील.

(हेही वाचा – Nanded News : नांदेड मधील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच आजारी, जनआरोग्याच्या अभ्यासात अनेक त्रुटी समोर)

एटीएसच्या (UP ATS) या महिला कमांडोंना एके-47 सारखी आधुनिक शस्त्रे देखील देण्यात आली आहेत. तसेच ग्लॉक पिस्तूलांसह, या महिला कमांडो केवळ शत्रूवर लक्ष ठेवणार नाहीत तर आवश्यक असल्यास त्यांच्याशी थेट दोन हात सुद्धा करतील. दहशतवादी घटनांपासून ते गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी काम करणारी ही देशातील पहिली महिला कमांडो टीम आहे.

खोलीत उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांना (UP ATS) अटक करणे किंवा कोणत्याही बहुमजली इमारतीत प्रवेश करणे आणि देशाच्या शत्रूंना नियंत्रित करणे हे आव्हान असो, त्यांना प्रत्येक परिस्थितीसाठी एनएसजी आणि एसपीजीसारखे प्रशिक्षण दिले जात आहे.

महिला कमांडोना एके-47 रायफल मिळणार

त्यांना ग्लॉक पिस्तूल, एम. पी. 5 आणि ए. के. 47 (UP ATS) सारखी धोकादायक आणि स्वयंचलित शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या महिला कमांडोची निवड कठोर तपासणीनंतरच करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी त्यांची शारीरिक, मानसिक ताकद आणि प्रतिभा तपासल्यानंतर राज्यभरातील नागरी पोलीस आणि पीएसीमध्ये तैनात असलेल्या महिला कॉन्स्टेबलची निवड केली आहे. प्रशिक्षणासाठी 30 महिला कमांडो तयार केल्या जात आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.