Captain Sanjay Parashar : शालेय पुस्तकांतून इस्लामीकरणाचे धडे देणाऱ्या पाकिस्तानकडून शांतीची अपेक्षा काय करता?

अशा कट्टरतावाद्यांकडून शांतीची अपेक्षा काय करता, असा सवाल कॅप्टन संजय पराशर यांनी उपस्थित केला.

125
Captain Sanjay Parashar : शालेय पुस्तकांतून इस्लामीकरणाचे धडे देणाऱ्या पाकिस्तानकडून शांतीची अपेक्षा काय करता?
Captain Sanjay Parashar : शालेय पुस्तकांतून इस्लामीकरणाचे धडे देणाऱ्या पाकिस्तानकडून शांतीची अपेक्षा काय करता?

बालमनावर कोरलेली प्रत्येक गोष्ट ही जीवनाला दिशा देणारी ठरते, असे म्हणतात. पण, पाकिस्तानात शाळेच्या पुस्तकांतूच इस्लामीकरणाचे धडे दिले जात आहे. त्यामुळे अशा कट्टरतावाद्यांकडून शांतीची अपेक्षा काय करता, असा सवाल कॅप्टन संजय पराशर यांनी उपस्थित केला. (Captain Sanjay Parashar)

सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने शनिवारी, २१ ऑक्टोबरला दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात पाकिस्तान्स रेप ऑफ काश्मीर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कॅप्टन संजय पराशर बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, लेफ्टनंट कर्नल मनोजकुमार सिन्हा, ब्रिगेडियर हेमंत महाजन, कॅप्टन सिकंदर रिझवी यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सह कार्यवाह स्वप्नील सावरकर आदी उपस्थित होते. (Captain Sanjay Parashar)

कॅप्टन संजय पराशर म्हणाले, तिकडे पाचवीच्या पुस्तकातून इतिहास शिकवला जातो की, पाकिस्तान बंगालपर्यंत विस्तारलेला होता. ११ व्या शतकातच आपण उदयाला आलो. मोहम्मद आली कासिमने पाकिस्तानची मुहुर्तमेढ रोवली. १९७१ चे युद्ध आपण हरलो नाही, तर पूर्व पाकिस्तानात हिंदू अधिक होते, ते भारताला पैसे पाठवायचे, ते मुस्लिमांच्या विरोधात होते. त्यामुळे आम्ही युद्ध सोडले! याऊलट आपल्याकडे पुस्तकातून समता, बंधुता शिकवली जाते. पण त्यांच्याकडे धडे मिळतात इस्लामीकरणाचे. बालवयातच मुलांच्या मनावर जिहाद आणि कट्टरता बिंबवली जाते. सोशल मीडिया आल्यावर ते त्याचा प्रभावी वापर करून आपला अजेंडा पुढे रेटत आहे. (Captain Sanjay Parashar)

(हेही वाचा – Mumbai Crime : तुटलेला दात आणि ८०० रुग्णालयाच्या शोधानंतर सापडला चोर)

फंडिंगसाठी स्टॅटर्जी

पाकव्याप्त काश्मीरचे बजेट सर्वात कमी आहे. त्यामागेही मोठी स्ट्रॅटर्जी आहे. इथले सर्वाधिक व्यक्ती युकेमध्ये कामासाठी स्थायिक झाले आहेत. इंग्लंडमध्ये भारतीयांची संख्या अधिक आहे, असा आपला भ्रम आहे. पण, वास्तवात इंग्लंडमध्ये सर्वाधिक संख्या ही पाकव्याप्त काश्मिरी मुस्लिमांची आहे. तिथून पैसा इकडे पुरवला जातो. काश्मिरमध्ये एक दहशतवादी आमदार होतो. तो आपले दहशतवादी संघटन पाकिस्तानातून चालवतो आणि भारतविरोधी कारवाया करतो. तरीही त्याला राजकीय संरक्षण मिळते. याचा अर्थ आपल्या कमकुवत राजकीय शक्तीचा फायदा ते घेत आले आहेत. यांच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही, पण आपल्याकडे आहे. त्यामुळे समता, बंधुता या मुल्यांसोबतच युवा पीढीमध्ये राष्ट्राभिमान जागृत करायला हवा, असेही कॅ. पराशर म्हणाले. (Captain Sanjay Parashar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.