भारतातील पहिली रॅपिडएक्स ट्रेन सुरू करण्यात आली आहे. (RapidX Train) शनिवारी ती रुळावर येताच प्रवाशांचा उत्साह सातव्या आकाशात होता. पहिल्या दिवशीच या रेल्वेने 10,000 हून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाच्या (एनसीआरटीसी) एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा आकडा आणखी जास्त असू शकतो. काही दिवसांतच नेमकी संख्या कळू शकेल. (RapidX Train)
(हेही वाचा – Health Tips : फ्रीजमध्ये चुकूनही ठेऊ नका ‘ही’ फळे, पोषक तत्वे होतील कमी)
रॅपिडएक्सच्या फेऱ्यांना सुरुवात
एन.सी.आर.टी.सी.च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, उद्घाटनानंतर पहिली ‘नमो भारत’ ट्रेन सकाळी 6 वाजता रवाना झाली आणि तिला प्रवाशांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. काही प्रवासी पहाटे 4.30 वाजता स्टेशनवर पोहोचले होते. या ऐतिहासिक प्रवासाचा भाग होण्यासाठी लोक उत्सुक होते. मुरादनगरसारख्या जवळच्या भागातून आणि दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील दुर्गम भागांतून लोक आले होते. (RapidX Train)
पहिल्या दिवशीच प्रवासी अडकले
एन.सी.आर.टी.सी.चे व्यवस्थापकीय संचालक विनय कुमार सिंह यांनीही ‘नमो भारत’ ट्रेनमध्ये प्रवास केला. विनय कुमार सिंह यांनी सकाळी भारताच्या पहिल्या ‘नमो भारत’ ट्रेनच्या प्रवाशांच्या पहिल्या गटाचे स्वागत केले आणि प्लॅटफॉर्मवर आणि डब्यात त्यांच्याशी संवाद साधला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांच्या पहिल्या गटाला ‘फर्स्ट रायडर’ म्हणून मान्यता देणारे प्रमाणपत्रही त्यांना देण्यात आले, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा कंदील
‘नमो भारत’ ट्रेन उच्च तंत्रज्ञानाच्या सुविधांनी सुसज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्ली-गाझियाबाद-मेरठ आरआरटीएस कॉरिडॉरच्या या भागाचे उद्घाटन साहिबाबाद स्थानकावर केले आणि रेल्वे प्रवासही केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवासी सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहतील. प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
पहिल्याच दिवशी ‘नमो भारत’ ट्रेनने प्रवास करण्यासाठी सकाळपासून प्रवासी उत्साही होते. त्यांच्यापैकी काहीजण भारताच्या पहिल्या ‘नमो भारत’ रेल्वेगाडीचे प्रवासी असल्याच्या आनंदात नाचत होते. (RapidX Train)
180 किमी ताशी गती
भारताच्या पहिल्या सेमी-हाय स्पीड प्रादेशिक रेल्वे सेवेचा उद्देश अत्याधुनिक तंत्रज्ञानासह प्रवासाला आणखी पुढे नेणे हे आहे. आर.आर.टी.एस. ही एक सेमी-हाय-स्पीड, हाय-फ्रिक्वेन्सी प्रवासी वाहतूक प्रणाली आहे. तिचा वेग ताशी 180 किमी आणि वेग मर्यादा ताशी 160 किमी आहे. ही ट्रेन साहिबाबाद, गाझियाबाद, गुलधर, दुहाई आणि दुहाई डेपो या ५ स्थानकांवर धावेल.
एका प्रीमियमसह सहा डबे
दिल्ली आणि मेरठ दरम्यान भारतातील पहिल्या आर.आर.टी.एस.च्या बांधकामाच्या देखरेखीचे काम एन.सी.आर.टी.सी.कडे सोपवण्यात आले आहे. दिल्ली-गाझियाबाद-मेरठ या 82.15 किलोमीटर लांबीच्या संपूर्ण आर.आर.टी.एस.चे काम जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. सर्व ‘नमो भारत’ गाड्यांमध्ये एका प्रीमियम कोचसह सहा डबे असतात. प्रत्येक ट्रेनमध्ये एक डब्बा महिलांसाठी राखीव असतो आणि तो प्रीमियम डब्याच्या बाजूचा डब्बा असतो. याशिवाय, इतर डब्यांमधील जागा महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव आहेत.
किती असेल भाडे?
साहिबाबाद ते दुहाई डेपो स्थानकापर्यंतच्या एकमार्गी प्रवासाचे भाडे 50 रुपये असेल, तर त्याच मार्गावरील प्रीमियम डब्यांचे भाडे 100 रुपये असेल. प्रवाशांना शेवटच्या मैलाच्या कनेक्टिव्हिटीसाठी, एन.सी.आर.टी.सी.ने इलेक्ट्रिक ऑटो-रिक्षांचीही व्यवस्था केली आहे. देशातील पहिल्या आरआरटीएस कॉरिडॉरच्या प्राधान्य विभागात प्रवासी वाहतुकीच्या पहिल्या दिवशी ‘आरआरटीएस कनेक्ट ॲप’ 2,000 हून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले, असे एनसीआरटीसीने म्हटले आहे. (RapidX Train)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community