Ind vs Nz : भारतीय संघात सुर्यकुमार यादव आणि महम्मद शामीच्या समावेशाचे संकेत 

हार्दिक पांड्याला झालेल्या दुखापतीमुळे सुर्यकुमार यादव आणि महम्मद शामीच्या यांच्यासाठी संघाचे दरवाजे खुले झाले आहेत. पण, हे सगळं झालं ते ही एका नाट्यानंतर…

117
Ind vs Nz : भारतीय संघात सुर्यकुमार यादव आणि महम्मद शामीच्या समावेशाचे संकेत 
Ind vs Nz : भारतीय संघात सुर्यकुमार यादव आणि महम्मद शामीच्या समावेशाचे संकेत 

ऋजुता लुकतुके

रविवारी भारत आणि न्यूझीलंड (Ind vs Nz) हे गुणतालिकेतील दोन अव्वल संघ धरमशाला इथं आमने सामने येत आहेत. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला झालेल्या दुखापतीमुळे सुर्यकुमार यादव आणि महम्मद शामी यांना संघात संधी मिळणार. आणि शार्दूल ठाकूरला डगआऊटमध्ये बसावं लागणार हे जवळ जवळ निश्चित आहे. पण,  भारतीय ड्रेसिंग रुममध्ये या सामन्या आधी वेगळंच नाट्य घडलं. काय ते बघूया…

शनिवारी संध्याकाळी धरमशाला इथं भारतीय संघाचा नेट्समध्ये सराव सुरू होता. आणि त्यातच थ्रो-डाऊन दरम्यान डी राघवेंद्रन आपल्या वेगवान चेंडूचा मारा भारतीय फलंदाजांवर करत होते. आणि अचानक सुर्यकुमार यादवच्या उजव्या मनगटाच्या वर एक चेंडू जोरदार बसला. त्याचा हात सुजला. आणि हाताला बर्फ लावत त्याने तात्काळ नेट्स सोडलं.

दुसरीकडे दिव्यांमध्ये सराव सुरू असल्यामुळे मैदानात काही मधमाशाही दिव्याभोवती जमल्या होत्या. आणि अचानक त्यातली एक ईशान किशनला डोक्याच्या मागे चावली. ईशान चांगलाच कळवळला. आणि काही क्षण तो उड्या मारताना दिसत होता.

(हेही वाचा-IOA CEO Appointment : ऑलिम्पिक असोसिएशनला लवकरच नवीन सीईओ मिळेल, पी टी उषा यांना विश्वास)

खरंतर भारतीय संघ प्रशासन आणि राहुल द्रविडने संघ धरमशालाला पोहोचल्या पोहोचल्याच सुर्यकुमार आणि महम्मद शामी यांना ते संघात खेळणार असल्याचं सांगितलं होतं. पीटीआयने त्याविषयीची बातमी दिली होती. पण, अचानक सुर्यकुमारचं हे दुखणं उपटलं. थ्रो-डाऊनमध्ये चेंडू सरासरी १५० किमी प्रती तास वेगाने येतात. त्यामुळे सुर्यकुमारचं हाताचं हाडही मोडू शकलं असतं. पण, सुदैवाने तसं झालेलं नाही. आणि संघ प्रशासनाकडून अजूनही सुर्यकुमार यादव आणि महम्मद शामीच्याच संघ समावेशाचे संकेत मिळत आहेत. शनिवारी मात्र सुर्यकुमार आणि ईशान किशनने सगळ्यांना घाबरवलं होतं.

हार्दिक पांड्या आधीच्या सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर बंगळुरूमध्ये उपचार घेत आहे. त्यात या दोन दुखापतींची भर भारतीय संघाला नको होती.

हार्दिक पांड्या सारखा अष्टपैलू खेळाडू महत्त्वाच्या सामन्यात खेळणार नसल्यामुळे भारतीय संघासमोर अवघड पेच होता. कारण, तो सहाव्या क्रमांकावर आक्रमक फलंदाजी करू शकत होता. आणि सहावा गोलंदाज म्हणून तेज चेंडू टाकू शकत होता. हार्दिक खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडू आहे.

पण, त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघ एक तज्ज फलंदाज (सुर्यकुमार यादव) आणि एक तज्ज गोलंदाज (महम्मद शामी) खेळवणार हे आता निश्चित आहे. एकतर धरमशालाची खेळपट्टी थंड वातावरणात तेज गोलंदाजांना साथ देते. आणि दुसरं म्हणजे हार्दिक नसताना संघाला सहाव्या गोलंदाजाची सुरक्षितता मिळणार नाही. त्यामुळे दहा षटकं टाकणारे पाच गोलंदाज भारतीय संघाला हवे आहेत. फलंदाजीतही सुर्यकुमार हा तज्ज फलंदाजालाच संघाने पसंती द्यायचं ठरवलं आहे. या बदलांमुळे शार्दूल ठाकूरला संघाबाहेर बसावं लागण्याचीच शक्यता आहे.(Ind vs Nz)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.