World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेकडून इंग्लंडचा 229 धावांनी दारूण पराभव

173
World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेकडून इंग्लंडचा 229 धावांनी दारूण पराभव

विश्व चषक स्पर्धेतील गतविजेत्या इंग्लंडच्या संघाला (World Cup 2023) शनिवार 21 ऑक्टोबर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून 229 धावांनी मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

विश्व चषक क्रिकेट स्पर्धेतील (World Cup 2023) आजच्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 50 षटकात 7 गडी गमावून 399 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाचा 22 षटकात धुव्वा उडाला. इंग्लंडचे सर्व फलंदाज 170 धावांमध्ये गुंडाळल्या गेल्यामुळे संघाला 229 धावांनी पराभव पत्करावा लागला. यंदाच्या स्पर्धेतील इंग्लंडचा हा सलग तिसरा पराभव आहे.

या सामन्यात इंग्लंडकडून (World Cup 2023) मार्क वूडने सर्वाधिक नाबाद 43 धावा केल्या. तर गस एटकिन्सनने 35, डेव्हिड विली 12, आदिल रशीद 10, हॅरी ब्रूक 17, जोस बटलर 15, बेन स्टोक्स 5. जॉनी बेअरस्टो 10, डेव्हिड मलान 6 आणि जो रूट 2 धावा करून बाद झाले. गेराल्ड कॉटजीला 3, मार्को जॅन्सन आणि लुंगी एनगिडीला प्रत्येकी 2, कासिगो रबाडा आणि केशव महाराजला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून हेन्रिक क्लासेनने सर्वाधिक 109 धावा केल्या. त्यानंतर रिझा हेंड्रिक्सने 85, मार्को यान्सेनने 75, ड्युसेनने 60, मार्करमने 42 धावा केल्या. इंग्लंडकडून रीस टॉपलीने 3, गस एटकिन्सनने 2, आदिल रशीदने 2 विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कॉटझीने सर्वाधिक 3 बळी घेतले. लुंगी एनगिडी आणि मार्को जॅन्सन यांनी 2-2 विकेट घेतल्या. तर कागिसो रबाडाला एक विकेट मिळाली. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर 15, डेव्हिड विली 12, आदिल रशीद 10 आणि हॅरी ब्रूकही 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले.

(हेही वाचा – Ind vs Nz : भारतीय संघात सुर्यकुमार यादव आणि महम्मद शामीच्या समावेशाचे संकेत )

द. आफ्रिकेने दिलेल्या 400 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग (World Cup 2023) करण्यासाठी उतरलेल्या इंग्लिश संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या 10 षटकात संघाने 4 विकेट गमावल्या. जॉनी बेअरस्टो केवळ 10, डेव्हिड मलान 6, जो रूट 2 आणि बेन स्टोक्स 5 धावा करून बाद झाले. संघाने 10 षटकांत 67 धावा केल्या, पण 4 विकेटही गमावल्या. दक्षिण आफ्रिकेकडून क्लॉसेनने शतक झळकावले. तर 3 खेळाडूंनी पन्नास धावा केल्या. रीझा हेंड्रिक्सने 85, मार्को यान्सेनने 75, रॅसी व्हॅन डर डुसेनने 60 आणि एडन मार्करामने 42 धावा केल्या. इंग्लंडकडून रीस टॉपलीने 3 बळी घेतले. तर आदिल रशीद आणि गस ऍटकिन्सनने 2-2 विकेट घेतल्या.दक्षिण आफ्रिकेकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हेन्रिक क्लासेनने उत्कृष्ट फलंदाजी केली. सेट झाल्यानंतर त्याने मोठे फटके मारले आणि अवघ्या 61 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तो 67 चेंडूत 109 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 12 चौकार लगावले. 37व्या षटकात 5 विकेट पडल्यानंतर मार्को यान्सेन फलंदाजीला आला. सेट झाल्यानंतर त्याने झटपट धावाही केल्या. 35 चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने 42 चेंडूत 75 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीत त्याने 3 चौकारांसह 6 षटकार मारले. त्याने हेन्रिक क्लासेनसोबत 77 चेंडूत 151 धावांची भागीदारी केली. (World Cup 2023)

क्विंटन डी कॉक (World Cup 2023) पहिल्याच षटकात बाद झाला. त्याच्या विकेटनंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रॅसी व्हॅन डर ड्युसेनने अर्धशतक केले. त्याने सलामीवीर रीझा हेंड्रिक्ससोबत 121 धावांची भागीदारीही केली. व्हॅन डर डुसेन 60 धावा करून बाद झाला आणि त्यांची भागीदारी तुटली.व्हॅन डर डुसेननंतर रीझा हेंड्रिक्सने एडन मार्करामसोबत 39 धावांची भागीदारी केली. तो 85 धावा करून आदिल रशीदचा बळी ठरला. त्याच्यापाठोपाठ मार्करामही 42 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. संघाकडून डेव्हिड मिलरला केवळ 5 धावा करता आल्या.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.