जिहादी दहशतवादाच्या विरोधात आणि इस्रायलच्या समर्थनार्थ बजरंग दल आणि एकवटले आहेत. (Israel-Hamas War) हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदु परिषदेतर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला. या वेळी मोर्च्यात कार्यकर्त्यांनी शेकडो संख्येने जमून आझाद मैदानात जोरदार विरोध प्रदर्शन केले. “हजारो वर्षांपासून भारत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत आहे. त्यामुळे इस्रायली नागरिकांची वेदना आपण एक देश म्हणून समजू शकतो. केवळ मानवतेच्या दृष्टीकोनातून आपण इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला पाहिजे”, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी केले. इस्रायलच्या समर्थनार्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून शनिवार, २१ ऑक्टोबर रोजी आझाद मैदान येथे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये ते बोलत होते. (Israel-Hamas War)
(हेही वाचा – Cyclone Tej : पुढील २४ तास महत्वाचे; IMD कडून अलर्ट जारी)
मुंबईच्या मुस्लीम जिमखाना येथे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ शुक्रवारी एक सभा घेतली. या सभेत इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. अबू आझमीच्या या कृत्याचा या वेळी निषेध करण्यात आला. पॅलेस्टाईनच्या नावाखाली हमासचे समर्थन करणाऱ्या काँग्रेसचाही विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री श्रीराज नायर यांनी नाव न घेता निषेध केला.
‘युद्ध हमासने सुरू केले आहे. याची किंमत त्यांना मोजावीच लागेल. भारत सरकारने इस्रायलला पाठिंबा दिला असताना देखील त्याला विरोध करणाऱ्या देशातील दहशतवादी हमासच्या समर्थकांना शोधून काढून त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल भारत सरकारकडे करत आहे’, असे श्रीराज नायर या वेळी म्हणाले. (Israel-Hamas War)
दहशतवादी संघटना हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत १३०० पेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला आहे. या संकटप्रसंगी इस्रायलला पाठिंबा देण्यासाठी आणि हमास समर्थकांचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंद दलाने मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. दोन्ही संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला. (Israel-Hamas War)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community