Cyclone Tej : पुढील २४ तास महत्वाचे; IMD कडून अलर्ट जारी

141
Cyclone Tej : पुढील २४ तास महत्वाचे; IMD कडून अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) शुक्रवारी सांगितले की, अरबी समुद्राचे आग्नेय आणि लगतचे नैऋत्य क्षेत्र कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे, त्यामुळे शनिवार २१ ऑक्टोबर रोजी चक्रीवादळ (Cyclone Tej) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अरबी समुद्रातील हे या वर्षातील दुसरे चक्रीवादळ असेल. या चक्रीवादळाला ‘तेज “असे नाव देण्यात आले आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हे चक्रीवादळ (Cyclone Tej) रविवारी २२ ऑक्टोबर रोजी तीव्र चक्रीवादळात बदलू शकते आणि दक्षिणेकडील ओमान आणि येमेनच्या किनाऱ्यावर धडकू शकते. तथापि, हवामान विभागाने अशी भीती व्यक्त केली आहे की हे वादळ देखील मागील चक्रीवादळ बिपरजॉयप्रमाणे आपला मार्ग बदलू शकते. हे वादळ अरबी समुद्रात वायव्येकडे वळणार होते, परंतु त्याने आपली दिशा बदलली आणि गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानातील कराचीच्या किनाऱ्यावर धडकले आहे. आतापर्यंत, हे चक्रीवादळ येमेन-ओमानच्या किनाऱ्यावर धडकेल अशी चिन्हे दिसत आहेत. (Cyclone Tej)

(हेही वाचा – Israel-Hamas War : इस्रायलची वेस्ट बँकमधील मशीद परिसरात मोठी कारवाई; दहशतवादी तळ उद्ध्वस्त)

अशातच पुढील २४ तासांत हे चक्रीवादळ आक्राळ-विक्राळ रूप धारण करू शकतं. पुढील २४ तासांत त्याचे आणखी खोल दाबात रुपांतर होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे. हवामान विभागाने या चक्रीवादळाचं वर्णन अतिशय तीव्र चक्रीवादळ असं केलं आहे. हवामान खात्याने यापूर्वी माहिती देताना सांगितलं होतं की, तेज चक्रीवादळ २१ ऑक्टोबर रोजी रात्री ११:३० वाजता तीव्र होईल. मात्र आता हे वादळ २२ ऑक्टोबरच्या दुपारच्या सुमारास अतिशय तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या चक्रीवादळाचा वेग आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.