Maratha Reservation : ‘… तर २५ तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण’; जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

141
Maratha Reservation : '... तर २५ तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण'; जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मंगळवार, २४ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनापूर्वीच एकीकडे जालन्यातील ४७ वर्षीय आंदोलनकर्त्याने मुंबईतील वांद्रे पूर्व येथे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (१९ ऑक्टोबर) पहाटे उघडकीस आली. सुनील बाबुराव कावळे असे या आंदोलनकर्त्याचे नाव होते. या आंदोलनकर्त्याच्या आत्महत्येमुळे मराठा आंदोलन चिघळणार असल्याची शक्यता वर्तवली जात असतांनाच अजून एका तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे.

तर दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Maratha Reservation) यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र आता हा वेळ संपत आला तरी सरकारकडून कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेलं नाही. त्यामुळेच जर आता सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर पुन्हा उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

(हेही वाचा – Navi Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी ‘नमो महिला अभियाना’चा शुभारंभ !)

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

“राज्य सरकारने २४ तारखेच्या आत मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) निर्णय घेतला नाही तर २५ तारखेपासून मी आमरण उपोषण करणार आहे. त्या उपोषणामध्ये कोणत्याही प्रकारचे उपाचर, वैद्यकीय सेवा घेतली जाणार नाही. मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून कठोर उपोषण केले जाणार आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत गावात एकाही राजकीय नेत्याला येऊ दिले जाणार नाही. आरक्षण घेऊनच गावात यायचं. तसेच २५ तारखेपासून साखळी उपोषण केले जाणार आहे. २८ तारखेपासून या साखळी उपोषणाचे आमरण उपोषणात रुपांतर होणार आहे. याची तयारी मराठा समाजाने केली आहे. प्रत्येक गावात मराठा समाजाने येऊन कॅन्डल मार्च काढायचा आहे. हे शांततेचं आंदोलन सुरु झाल्यानंतर सरकारला झेपणार नाही,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. (Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.