मानवाला अंतराळात पाठवण्यासाठी गगनयान मोहीम यशस्वीरित्या पार पडली. या मोहिमेची उड्डाण चाचणीही यशस्वी झाली. अंतराळातील रहस्ये उलगडण्यासाठी भारत सातत्याने इस्त्रोमार्फत (ISRO) विविध मोहिमा राबवत आहे. गगनयान मोहिमेबाबत इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ (Istro chief S. Somnath) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
देशाच्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेत महिला फायटर जेट पायलट किंवा वैज्ञानिकांना प्राधान्य दिले जाणार असून त्यांना अंतराळात पाठवले जाईल, असे एस. सोमनाथ यांनी सांगितले. त्यांनी पुढे माहिती दिली की, इस्त्रो पुढील वर्षी मानवयुक्त गगनयानमध्ये महिला ह्युमनॉइड (मानवासारखा दिसणारा रोबोट) पाठवेल. या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे उद्दिष्ट मानवांना पृथ्वीपासून ४०० किमी अंतराळात पाठवून सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे आहे.
(हेही पहा – World Cup 2023 :मोहम्मद शामीच्या शानदार गोलंदाजीनंतर, भारतासमोर २७४ धावांचे लक्ष्य)
गगनयान मोहिम (Gaganyaan mission) २०२५ पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. हे मिशन अल्पकालिन मिशन असेल. सुरुवातीला हवाई दलातील लढाऊ वैमानिकांकडून चाचणी घेतली जाईल. सध्या आमच्याकडे चाचणीसाठी महिला लढाऊ वैमानिक नाहीत. त्यामुळे भविष्यात महिला वैमानिकांचाही शोध घेण्यात येईल. २०३५ सालापर्यंत अंतराळ स्टेशन संपूर्णरित्या स्थापन करण्याचे इस्त्रोचे उद्दिष्ट असल्याची माहिती एस. सोमनाथ यांनी दिली.