मुंबई शहरातील कर्नाक बंदर येथील रेल्वे पुलाच्या बांधकामात अडसर ठरणाऱ्या बेस्टच्या वीज उपकेंद्र अर्थात सब स्टेशन आता कायमस्वरुपी हलवून महापालिकेच्या रोटा प्रिटींगच्या जवळच्या पर्यायी जागेत बनवण्यात येणार आहे. यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. (Carnac Bridge)
दक्षिण मुंबईतील कर्नाक बंदर येथील रेल्वेवरील पूलाचे बांधकाम रेल्वे प्राधिकरणामार्फत तोडल्यानंतर या पुलाची पुनर्बाधणी मुंबई महापालिकेच्या पूल विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. सध्या या पुलाचे काम प्रगतिपथावर असून या पूलाच्या पुनर्बाधणी कामामध्ये पूर्व व पश्चिम दोन्ही पोहोच रस्त्याचेही कामही सुरु आहे. परंतु पश्चिमेकडील पोहोच रस्त्याच्या भिंतीला लागून मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाचे अर्थात बेस्टचे विद्युत वितरण उपकेंद्र (सब स्टेशन)असून या पूलाच्या पोहोच रस्त्यांवरील तोडकाम करून त्याच्या पुनर्बांधणीचे कामात हे उपकेंद्र आहे. हे उपकेंद्र कायमस्वरूपी हलविण्याची गरज आहे. त्यानुसार, विद्युत वितरण उपकेंद्र हे पूलाजवळील महापालिकेच्या रोटा प्रिंटिंग प्रेस या पर्यायी ठिकाणी स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा : Crime : नाशिकमध्ये ३ ठिकाणी घातलेल्या छाप्यात साडेचार लाखांचा गुटखा जप्त)
हे वीज उपकेंद्र पर्यायी ठिकाणी जागेत हलवण्यासाठी येणारा खर्च हा ३ कोटी ३८ लाख ९५ हजार ४२९ रुपये एवढा असून बेस्टने हे उपकेंद्र हलवण्यासाठी एवढा खर्च येणार असल्याचे महापालिकेला कळवले आहे. त्यानुसार उपकेंद्र हटवून पर्यायी जागेत स्थानांतरीत करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा निधी महापालिकेने बेस्टला अदा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मस्जिद बंदर लोकमान्य टिळक मार्ग येथील १४५ वर्षे जुना असलेला कर्नाक बंदर उड़डाणपुल धोकादायक ठरल्यामुळे मागील २०१६पासून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला होता आणि मागील वर्षी रेल्वेवरील भाग रेल्वेच्यावतीने तोडून याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. एकूण १५० मीटर लांबी आणि २६.५ मीटर रुंदीच्या या उड़डाणपुलाची पाच स्पॅनमध्ये उभारणी केली जाणार आहे. स्टील गर्डर, पी.एस.सी. गर्डर व आर.सी.सी. डेक स्लॅबचे बांधकाम केले जाणार आहे.
हेही पहा –