india-Pakistan Cricket Match: विचारांचे सीमोल्लंघन झालेच पाहिजे !

रामनामामध्ये तल्लीन होणे गरजेचे असते, त्या नावावर तुम्ही आक्षेप घेता?

131
india-Pakistan Cricket Match: विचारांचे सीमोल्लंघन झालेच पाहिजे!
india-Pakistan Cricket Match: विचारांचे सीमोल्लंघन झालेच पाहिजे!
  • जयेश मेस्त्री 

वर्ल्ड कपमधील भारत-पाक क्रिकेट सामन्यादरम्यान (india-Pakistan Cricket Match) पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान बाद झाल्यावर ड्रेसिंग रुमकडे जात असताना प्रेक्षकांनी ’जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. या घटनेवर काही जणांनी संताप व्यक्त केला आहे. राजदीप सरदेसाई, उदयनिधी स्टॅलिन, साकेत गोखले यांनी हा राष्ट्रीय विषय बनवला असून नरेंद्र मोदींवरदेखील निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सोशल मीडियावर काहींनी तर कॉंग्रेसच्या काळात भारतीय प्रेक्षक खूप चांगले होते मात्र भाजपच्या काळात हा उन्माद वाढू लागला आहे असं म्हटलं आहे. साकेत गोखले ट्विट करत म्हणाले, ‘Not surprisingly – the stadium where this happened is called Narendra Modi stadium.’ तर स्टॅलिन यांचे म्हणणे आहे की ‘आपल्या शेजारच्या देशातील खेळाडूंबरोबर जे झालं, ती कृती खालच्या स्तरावरची होती. हे सहन करण्यायोग्य नव्हतं. खेळाने देश एकत्र व्हायला हवा. लोकांमधलं प्रेम आणि बंधुभाव वाढायला हवा, लोकांमध्ये तिरस्कार पसरवण्याचं शस्त्र म्हणून खेळाचा वापर केला जाऊ नये.’

जर स्टेडियममध्ये श्रीराम म्हणणं हे चुकीचं असेल, तर याची सुरुवात स्वतः रिझवाननेच केलेली आहे. श्रीलंकेला हरवल्यानंतर त्याने हा विजय ’गाझामधल्या त्याच्या बंधू आणि भगिनींना’ अर्पण केला. क्रिकेटच्या मैदानावर राजकारण रिझवानने आणलं. याला मी त्याची पंथभक्ती म्हणेन. तो पाकिस्तानी आहे आणि त्याहीपेक्षा विशेष म्हणजे तो मुसलमान आहे आणि दूर देशातल्या मुसलमानाविषयी त्याच्या मनात सहानुभूती आहे. पाकिस्तान देशाच्या एकंदर बौद्धिक पातळीनुसार त्यांना इस्रायल-पॅलेस्टाइन वाद नेमका काय आहे हे नक्कीच माहित नसणार. तरी देखील मुसलमान देश असल्यामुळे ते पाठिंबा दर्शवत आहेत. मुद्दा असा की पाक आणि गाझा दोन्ही मुस्लिम राष्ट्रे आहेत. मात्र स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय मुस्लिमांनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला होता. तेव्हाच हिंदूंना हे समजायला हवं होतं की पाकिस्तानच्या निर्मितीची पायाभरणी झालेली आहे. पाकिस्तान निर्मिती दरम्यान हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले. पाक निर्मितीनंतरही त्या दळभद्री देशाने हिंदूंना त्रास देण्याची, अतिरेकी कारवाई करण्याची एकही संधी सोडलेली नाही आणि रिझवान त्याच देशाचा नागरिक आहे.

(हेही वाचा – Carnac Bridge : कर्नाक बंदर पुलाच्या बांधकामात अडसर, बेस्टचे सब स्टेशन अन्यत्र हलवणार )

जे संघ भारतात खेळायला येतात, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी भारत सरकारची असते आणि सरकार त्यामध्ये कोणतीही चूक करणार नाही. रिझवानसारख्या माजोरड्या क्रिकेटरला पाहून जर प्रेक्षकांनी ’जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या असतील तर ही अतिशय सामान्य बाब आहे. याचा मुद्दा बनवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला मुळात त्यांच्या देशभक्तीवर आणि धर्मभक्तीवर संशय घेतला गेला पाहिजे. पाकिस्तानी प्रवृत्तीकडून आजतागायत मानवजातीवर अनन्वित अत्याचार केले जात आहेत, तेव्हा तुमच्या ह्रदयाला वेदना होत नाहीत आणि ज्या रामनामामध्ये तल्लीन होणे गरजेचे असते, त्या नावावर तुम्ही आक्षेप घेता?

दुसरी गोष्ट क्रिकेटच्या फॅन्सकडून अशा गोष्टी खूपच सामान्य आहेत. भारत मॅच हरल्यावर भारतातील पाक प्रवृत्तीचे लोक जल्लोष साजरा करतात ही जास्त चिंतेची बाब आहे. त्यामुळे हिंदूंनी आता विचारांचं सीमोल्लंघन केलं पाहिजे. फालतू सेक्युलरिझ्मच्या नादाला न लागता प्रत्येक गोष्टीत आपण हिंदू हित लक्षात घेतलं पाहिजे. २०१२ नंतर राजकारणाचं हिंदुकरण व्हायला सुरुवात झालेली आहे. हे हिंदुकरण पुढची १०० वर्षे टिकून राहिल असं वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे. जेणेकरून पुढील १०० वर्षे भारताचं संविधान टिकून राहिल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.