कोविडच्या संसर्ग जन्य आजार हा हवेतून पसरत असल्याने मुंबईतील विविध ठिकाणी मिस्ट मशिन्सद्वारे हवेतील धुळीचे कण नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. परंतु मागील काही महिन्यांपासून गॅरेजमध्ये पडून राहिलेल्या या मिस्ट मशिन्स आता पुन्हा एकदा महापालिकेच्या कामी आल्या आहेत. (BMC MIST MACHINES)
वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत असल्याने कोविड काळात वापर केल्यानंतर गॅरेजमध्ये पडून राहिलेल्या या मशिन्सची दुरुस्ती करून त्या रस्त्यावर आणल्या आहेत. कोविड काळात सीएसआर निधीतून महापालिकेला तब्बल सात ते आठ मशिन्स प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे धुळ प्रतिबंधक यंत्राप्रमाणेच काहीशा या मशिन्स काम करत असल्याने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने तातडीने या मशिन्स रस्त्यावर आणून धुळीचे प्रमाण नियंत्रण राखण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येत आहे.
मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याने या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रित करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने तत्काळ उपाययोजना सुरू करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले होते.त्यानुसार मुंबईतील वरळी सी फेस, हाजी अली, पेडर रोड, स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी), नरिमन पॉईंट, फॅशन स्ट्रीट, बधवार पार्क, वर्ल्ड ट्रेड सेंटर परिसरात मिस्ट मशीन्सचा वापर करून हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. (BMC MIST MACHINES)
(हेही वाचा :World Cup 2023 :गिलने बाबर ला मागे टाकत वनडे क्रिकेट करिअरमध्ये केला मोठा विक्रम)
कोविडचा संसर्गजन्य आजार हवेतून पसरत असल्याने अनेक कंपन्यांनी महापालिकेला मदतीचा हात पुढे करत हवेतील पसरणाऱ्या या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी मिस्ट मशिन्स उपलब्ध करून दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या गॅरेजच्या माध्यमातून प्रत्येक रस्त्यावरून या मशिन्सचा वापर करण्यासाठी कार्यक्रम निश्चित करत त्यानुसार याचा वापर केला होता. परंतु कोविडनंतर या मशिन्स महापालिकेच्या गॅरेजमध्ये बंद पडून होत्या. परंतु अखेर महापालिकेला या बंद मशिन्सची आठवण झाली आणि त्यांनी या मशिन्स पुन्हा एकदा रस्त्यावर आणत याचा उपयोग करून घेण्यास सुरुवात केली आहे.
हेही पहा –