India-Canada Relations : भारत-कॅनडा वाद, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर याचं महत्त्वाचं वक्तव्य

कॅनडाच्या अधिकाऱ्यांना परत का पाठवले ?

167
India-Canada Relations : भारत-कॅनडा वाद, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर याचं महत्त्वाचं वक्तव्य
India-Canada Relations : भारत-कॅनडा वाद, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर याचं महत्त्वाचं वक्तव्य

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ( Foreign Minister S Jaishankar’s ) यांनी रविवारी भारत-कॅनडा संबंधावर (India-Canada Relations) भाष्य केले आहे. कॅनडाच्या कर्मचाऱ्यांनी देशाच्या कारभारात सतत हस्तक्षेप केल्यामुळे भारताने कॅनडाशी राजनैतिक समानतेची मागणी केली, त्यामुळे त्यांना आपले ४१ अधिकारी परत बोलवावे लागले. एका देशात किती नोकरशहा आहेत आणि दुसऱ्या देशात किती आहेत, यावरून समानता ठरवली जाते. ही समानता व्हिएन्ना कन्व्हेन्शनद्वारे प्रदान केली गेली आहे, असे ते यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आम्ही समानतेची मागणी केली, कारण आम्हाला कॅनडियन अधिकाऱ्यांकडून आमच्या कारभारात होणाऱ्या सततच्या हस्तक्षेपाची चिंता होती. मला विश्वास आहे की, कालांतराने अधिक गोष्टी प्रकाशात येतील आणि लोकांना समजेल की, आम्हाला का निर्णय घ्यावा लागला.

(हेही वाचा – BMC MIST MACHINES : कोविड काळातील मिस्ट मशिन्सची महापालिकेला झाली आठवण )

भारत-कॅनडा संबंधांवर जयशंकर म्हणाले की, सध्या संबंध कठीण टप्प्यातून जात आहेत. भारताची समस्या कॅनडाच्या काही राजकीय मुद्द्यांशी आहे. कॅनडाचा व्हिसा देणे पुन्हा कधी सुरू होईल ? या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, जर आम्हाला कॅनडातील आमच्या डिप्लोमॅट्सच्या सुरक्षेत प्रगती दिसली, तर आम्ही व्हिसा करण्यास पुन्हा सुरुवात करू.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.