एनआयएचे पोलिस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची अचानक बदली! चर्चेला उधाण

अनिल शुक्ला यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या जागेवर ज्ञानेंद्र कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

150

एनआयएचे पोलिस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची त्यांच्या मायदेशी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी ज्ञानेंद्र वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणात अनिल शुक्ला यांनी महत्वाची भूमिका बजावली होती, अचानक झालेल्या शुक्ला यांच्या बदलीमुळे चर्चेला उधाण आले आहे.

कोण आहेत अनिल शुक्ला?

अनिल शुक्ला हे मिझोराम कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. मुकेश अंबानी स्फोटके प्रकरण तसेच मनसुख हिरेन हत्या ही दोन्ही प्रकरणे एनआयएकडे तपासासाठी आल्यानंतर पोलिस महानिरीक्षक अनिल शुल्का यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तपास करण्यात आला होता. मुकेश अंबानी स्फोटके प्रकरण तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अनिल शुक्ला हे एकदाच प्रसारमाध्यमांसमोर आले होते. या प्रकरणात मर्सिडीज बेन्ज ही कार जप्त केली होती, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कारमध्ये दोन लाखांची रोकड, कपडे आणि नोटा मोजण्याची मशीन मिळाली असल्याचे त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते.

(हेही वाचाः अखेर माजी गृहमंत्री देशमुख यांचीही सीबीआय करणार चौकशी!)

शुक्लांच्या जागी वर्मा

अनिल शुक्ला हे महाराष्ट्र्रात प्रतिनियुक्तीवर होते व त्यांना महाराष्ट्रत सहा वर्षे पूर्ण झाली होती. त्यांची बदली मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणाच्या अगोदरच झाली होती. मात्र, या प्रकरणात त्यांना मुदत वाढ देण्यात आली होती. त्यांची बदली ही नियमानुसार झाली असल्याचे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले. अनिल शुक्ला यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या जागेवर ज्ञानेंद्र कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेंद्र कुमार वर्मा हे २००१ चे आयपीएस अधिकारी असून, यापूर्वी त्यांनीही सीबीआयचे पोलिस महानिरीक्षक (प्रशासन) म्हणून कार्यभार सांभाळला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.