Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धात चीनची उडी; जगाची चिंता का वाढली ?

इस्रायल-गाझा युद्धावरून वाढलेला तणाव आणि या प्रदेशातील मोठ्या संघर्षाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर चीनने मध्यपूर्वेत सहा युद्धनौका पाठवल्या आहेत.

131
Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धात चीनची उडी; जगाची चिंता का वाढली ?
Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धात चीनची उडी; जगाची चिंता का वाढली ?

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध चिघळत चालले आहे. (Israel Hamas War) मध्यपूर्वेत युद्ध सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले आहेत. कालांतराने हे युद्ध अधिक भयंकर होत चालले आहे, ज्यामध्ये इतर देशही हळूहळू प्रवेश करत आहेत. अमेरिकेची युद्धनौका इस्रायलजवळच्या समुद्रात पहारा देत आहे. यादरम्यान चीनने आता आपल्या युद्धनौका मध्यपूर्वेकडे पाठवल्या आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने मध्य पूर्व आशियात आपल्या सहा शस्त्रसज्ज युद्धनौका तैनात केल्या आहेत. याद्वारे अमेरिकेला शह देण्याचे ड्रॅगनचे मनसुबे समोर आले असल्याचे संरक्षणतज्ज्ञांना वाटू लागले आहे. (Israel Hamas War)

(हेही वाचा – Jagdish Dhodi : शिवसेनेच्या आदिवासी समाज राज्य संघटक पदी जगदीश धोडी यांची नियुक्ती)

इस्रायल-गाझा युद्धावरून वाढणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने मध्यपूर्वेत सहा युद्धनौका पाठवल्या आहेत. इस्रायलमधील युद्ध आणि गाझा पट्टीमधील हमास दहशतवादी गटाच्या दरम्यान 6 चिनी युद्धनौका मध्यपूर्वेत कार्यरत आहेत. (Israel Hamas War)

चीनचे 44 वे नेव्हल एस्कॉर्ट टास्क फोर्स मे महिन्यापासून या प्रदेशात नियमितपणे कार्यरत असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी ओमानच्या दौऱ्यादरम्यान ओमानी नौदलासोबत संयुक्त सरावही केला होता. येथून चिनी नौदलाचे एस्कॉर्ट टास्क फोर्स 18 ऑक्टोबर रोजी सकाळी ठरल्याप्रमाणे कुवेतच्या शुवाईख बंदरावर पोहोचले.

टास्क फोर्स पीपल्स लिबरेशनमध्ये जिबो, क्षेपणास्त्र विध्वंसक, फ्रिगेट जिंगझोऊ आणि पुरवठा जहाज कियान्डोहू यांचा समावेश आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेने मध्यपूर्वेत आपली युद्धनौका तैनात केली आहे. या युद्धात अमेरिका इस्रायलला पाठिंबा देत आहे. अमेरिकेने इस्रायलचे संरक्षण आणि मदत करण्यासाठी आपली धोकादायक युद्धनौका यु. एस. एस. जेराल्ड आर. फोर्ड तैनात केली आहे. याव्यतिरिक्त, पूर्व भूमध्यसागरामध्ये साहाय्यक जहाजे देखील तैनात करण्यात आली आहेत. (Israel Hamas War)

अलीकडच्या काळात अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढला आहे. सध्या, चीनच्या या कृतीमुळे जगाला आश्चर्य वाटले आहे. यामुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला आहे. (Israel Hamas War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.