ऋजुता लुकतुके
ट्रोव्ह या आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन बनवलेल्या इलेक्ट्रिक वाहनं उत्पादक कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणण्याची तयारी केली आहे. या महिनाअखेरीस कंपनीची बाईक विक्रीसाठी उपलब्ध होईल, अशी चिन्हं आहेत. (Trouve Motors Electric Bike)
मार्च २०२२ मध्ये ट्रोव्ह कंपनीने ही ई-बाईक (Trouve Motors Electric Bike) ऑटो-एक्स्पोमध्ये पहिल्यांदा लोकांसमोर पेश केली. तेव्हापासून तिची चर्चा तरुणांमध्ये आहे. एकतर आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी ती बनवलीय. तिचं संशोधन आजही नवी दिल्लीच्या आयआयटी कॉलेजमध्येच होतं. तर उत्पादन बंगळुरू येथील कारखान्यात होतं. आणि यात आजही दोन्ही आयआयटी संस्थांचा सहभाग आहे.
दुसरं म्हणजे २०० किमी ताशी वेगाने धावू शकणारी ही गाडी फक्त ३ सेकंदात इतका वेग गाठू शकते. तिच्या अत्याधुनिक इंजिनाबरोबरच तिचा डिस्प्लेही चर्चेचा विषय ठरला होता. कारण, तो ब्लॉकचेन प्रणालीवर आधारित आहे. आणि चालकांना हा डिजिटल डिस्प्ले मेटावर्हर्सचा आनंद आणि अनुभव देणार आहे.
ई-बाईक क्षेत्रात हा पहिलाच प्रयोग असल्याने त्याबद्दल तरुणांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. शिवाय कंपनीचा असा दावा आहे की, ही जगातील सगळ्यात सुरक्षित दुचाकी आहे.
Trouve aims to be synonyms with quality and safety.
Thats why all our models will come with liquid cooling and sensors and AI, intelligent enough to prevent most sorts of mishaps.
Lets build the future of electric vehicles#BeaTrouvian pic.twitter.com/zhbgazRGbC— Trouve Motor (@TrouveMotor) April 18, 2022
कंपनीने या बाईकविषयी फारशी माहिती जाहीर केलेली नाही. ऑटो-एक्स्पोमध्येही तिची फक्त झलक दाखवण्यात आली होती. पण, दुचाकी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचा दावा ट्रोव्ह कंपनीने वारंवार केला आहे. आताही ई-बाईक बरोबरच ते ई-स्कूटरही आणणार आहेत. ती देखील अत्याधुनिक तसंच चालकांना डिजिटल अनुभव देणारी असेल.
पण, अगदी या स्कूटरचे रंगरुपही त्यांनी उघड केलेलं नाही. ट्रोव्हमध्ये सुरू असलेलं संशोधन आणि नवे प्रयोग याविषयी जाणून घेण्यासाठी इच्छूकांना कंपनीच्या वेबसाईटवर संपर्क साधण्याचं आवाहन कंपनीने केलं आहे.
Trouve constantly working towards redefining the technology and design.
Introducing Trouve H2, as usual this will be again one of the safest EVs available. With a liquid cooled technology and LFP, it will also have an aluminium chasis and sensors to prevent overheat #BeaTrouvian pic.twitter.com/TI1QhORncf— Trouve Motor (@TrouveMotor) April 29, 2022
अत्याधुनिक अशा या भारतीय बनावटीच्या स्कूटर आणि बाईकची किंमतही तशीच मोठी असणार आहे. स्कूटर एक ते दीड लाख रुपयांपर्यंत उपलब्ध होईल. तर ई-बाईकची सुरुवातीची किंमत १० लाख रुपये इतकी असेल असं बोललं जातंय. ऑक्टोबर महिन्यातच या बाईकसाठी नोंदणी सुरू होईल, असा अंदाज आहे. (Trouve Motors Electric Bike)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community