अभिनेता सुशांतसिंह राजपूत हत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र आणि शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी केली होती. मात्र माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत नाही. ते इममॅच्युअर आहेत. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास असल्याचे शरद पवार म्हणालेत.
नेमकं काय म्हणाले पवार
माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. ते इममॅच्युअर आहेत. सीबीआय चौकशी कोणाला करायची असेल, तर माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला सीबीआय चौकशीची मागणी करायची असेल त्यासाठी कोणाचा विरोध नसावा असे पवार म्हणालेत. दरम्यान शरद पवार यांच्या या प्रतिक्रियेनंतर पार्थ पवार यांनी मात्र कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला. मला यावर काही बोलायचं नाही, असे पार्थ पवार यांनी सांगितले.
काय आहे पार्थ पवारांची मागणी
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास राज्याकडे रहावा अशी मागणी महाविकास आघाडीची असताना पार्थ पवार यांनी मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी योग्य तपास व्हावा अशी संपूर्ण देश, विशेषत: तरूणाईची अपेक्षा आहे. ही भावना लक्षात घेत याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी त्यांनी केली होती.
Join Our WhatsApp Community“आता आजोबा आणि नातूमधील वाद, संवाद, विवाद जे काही असेल त्यात आम्ही काय बोलावं…हा त्यांच्या घरचा प्रश्न आहे. आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचं आहे किंवा नातवाने आजोबांना आवडेल असं वागायचं की नाही हे नातवाने ठरवायचं आहे. त्यासंदर्भात मी बोलणं योग्य ठरणार नाही.
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते