मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिवसांची ४० मुदत दिली आहे. ही डेडलाईन संपत आहे.२४ तारखेनंतर सरकारला एक तासही अधिकचा वेळ देणार नाही, असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खासकरून सत्ताधारी वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र जरांगे पाटील यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. हातघाईवर येऊ नका, असा सल्ला देतानाच मराठा आरक्षणासाठी थोडा वेळ लागू शकतो, असं मोठं विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे. (Maratha Reservation)
जळगाव येते पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितले की सरकारला मराठा समाजाला टिकणारे शाश्वत असे आरक्षण द्यायचे आहे. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो,मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्यानुसार ४० दिवसांची मुदत नक्कीच संपत आहे. मात्र मराठा आरक्षणाबाबत शासन अतिशय सकारात्मक आहे. मराठा आरक्षणाचा विषय हा घाई गर्दीत करण्याचा विषय नाही. त्याला थोडा वेळ लागू शकतो. मराठा आरक्षण टिकलं पाहिजे या दृष्टीने सरकारचे प्रयत्न आहेत. पुन्हा मराठा समाजाची निराश होऊ नये यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. ४०दिवस झाले एक तासही देणार नाही अशा पद्धतीने वॉर लेव्हलवर, हात घाईवर येऊ नका अशी जरांगे पाटील यांना माझी विनंती आहे, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हणले आहे.
(हेही वाचा : Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धात चीनची उडी; जगाची चिंता का वाढली ?)
सुप्रियाताई तुम्ही आमची काळजी करू नका
देवेंद्र फडणवीस यांचं सतत डिमोशन होत असल्याने मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला होता. सुप्रिया सुळे यांच्या या टीकेला गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुप्रियाताई तुम्ही आमची काळजी करू नका. तुमच्या पक्षात काय चाललं आहे ते पहा. आपल्या पक्षामध्ये आता कोणीच शिल्लक राहिलं नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा. तुम्ही शरद पवार साहेबांची काळजी करा. आमच्या फडणवीस साहेबांची काळजी करू नका. आमचा पक्ष हा देशातला नंबर वन पक्ष आहे. तुमच्याकडे जे चार-पाच लोक राहिले आहेत त्यांची काळजी करा, असे टोले महाजन यांनी लगावले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community