Asian Games 2023 : भारतीय महिला मुष्टीयोद्धीला गमावावं लागू शकतं आपलं पदक 

देशातील एका आघाडीच्या मुष्टीयोद्धेला आपलं आशियाई क्रीडास्पर्धेतील पदक गमावावं लागू शकतं. आपण कुठे आहोत याची माहिती नाडाला न दिल्यामुळे ही कारवाई तिच्याविरुद्ध होऊ शकते.

162
Asian Games 2023 : भारतीय महिला मुष्टीयोद्धीला गमावावं लागू शकतं आपलं पदक 
Asian Games 2023 : भारतीय महिला मुष्टीयोद्धीला गमावावं लागू शकतं आपलं पदक 

ऋजुता लुकतुके

एका भारतीय महिला मुष्टीयोद्धीला आपलं आशियाई (Asian Games 2023) क्रीडास्पर्धेत जिंकलेलं पदक परत देण्याची तसंच पॅरिस ऑलिम्पिकमधील कोटा गमावण्याची वेळ आली आहे. हे तिच्या बाबतीत घडतंय वर्षभरात आपण कुठे कुठे जातोय त्याविषयीची माहिती आंतरराष्ट्रीय उत्तेजक द्रव्य चाचणी संस्थेपासून लपवल्यामुळे.

अर्थात, याविषयीचा अंतिम निर्णय (Asian Games 2023) अजून झालेला नाही. आणि सध्या आयटीएने (इंटरनॅशनल टेस्टिंग अथॉरिटी) शेवटची नोटीस जारी केली आहे. वरील कारवाई का करू नये असा प्रश्न यात विचारला आहे. भारतीय मुष्टीयुद्‌ध परिषद या बाबतीत खेळाडूच्या पाठीशी उभी आहे. आणि आशियाई खेळांपूर्वी खेळाडूकडून एका विचित्र परिस्थितीत या नियमांचं पालन झालं नाही, असं म्हणणं ते आयटीएकडे मांडणार आहेत.

या महिलेचं नाव जाणून बुजून गुप्त ठेवण्यात आलं आहे. तिने काही महिने आपण कुठे आहोत हे आयटीएपासून लपवलं. आणि त्या दरम्यान उत्तेजक द्रव्य चाचणीलाही ती हजर राहिली नाही. पुढे मुष्टीयुद्धाच्या रिंगणात तिने पुनरागमन केलं. आणि आशियाई खेळांमध्ये पदकही जिंकलं.

पण, जुन्या काळात तिच्याकडून झालेल्या चुका तिला भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेळाडूंना ते कुठे जातात आणि तिथला त्यांचा पत्ता आंतरराष्ट्रीय टेस्टिंग अथॉरिटीला कळवणं बंधनकारक आहे. अचानक घ्यायच्या उत्तेजक द्रव्य चाचणीसाठी हे महत्त्वाचं आहे. आपली कुठलीही माहिती पुरवण्यात खेळाडू कमी पडले. आणि अशी चूक सलग तिसऱ्यांदा झाली तर अशा खेळाडूवर निलंबनाची कारवाई होऊ शकते.

(हेही वाचा-Agniveer : सियाचीन येथे अग्नीवीर अक्षय लक्ष्मण गावते यांना वीरमरण; लष्कराकडून मिळणार ‘इतके’ साहाय्य)

आताही भारतीय खेळाडूवर २ वर्षांच्या निलंबनाची कारवाई होऊ शकते. पण, भारतीय मुष्टीयुद्ध संघटना खेळाडूच्या मागे उभी आहे. ‘ही महिला जेव्हा आपला पत्ता कळवत नव्हती, तेव्हा ती घरच्या जवळच्या व्यक्तीला झालेल्या मोठ्या आजारामुळे व्यथित होती. त्या काळात ती कुणाशीच संपर्क करण्याच्या परिस्थितीत नव्हती. शिवाय ही चूक आशियाई क्रीडास्पर्धे दरम्यान किंवा तिच्या जवळपासही झालेली नाही. त्यामुळे खेळाडूच्या तेव्हाच्या मनस्थितीचा विचार करून तिला माफ करावं, असं आवाहन आम्ही कऱणार आहोत,’ मुष्टीयुद्ध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.

भारतीय मुष्टीयुद्ध खेळाडूंची आशियाई खेळांमधील कामगिरी चांगली झाली. आणि त्यांनी देशासाठी ५ पदकं जिंकली. यात लवलिना बोरगोहेनच्या रौप्य पदकाचाही समावेश आहे. शिवाय भारतीय महिलांनी चार ऑलिम्पिक पात्रता कोटाही मिळवले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.