Ind vs Nz : कुलदीप आणि इतर फिरकी गोलंदाजांचं अपयश भारतीय संघाची डोकेदुखी?

न्यूझीलंड विरुद्ध सहा गडी राखून विजय मिळवत भारतीय संघाने गुणतालिकेत निर्णायक आघाडी घेतली आहे.

175
Ind vs Nz : कुलदीप आणि इतर फिरकी गोलंदाजांचं अपयश भारतीय संघाची डोकेदुखी?
Ind vs Nz : कुलदीप आणि इतर फिरकी गोलंदाजांचं अपयश भारतीय संघाची डोकेदुखी?
  • ऋजुता लुकतुके

न्यूझीलंड विरुद्ध सहा गडी राखून विजय मिळवत भारतीय संघाने गुणतालिकेत निर्णायक आघाडी घेतली आहे. पण, तुल्यबळ प्रतिस्पर्धी असलेल्या न्यूझीलंडने भारतीय गोलंदाजीतील कच्चे दुवेही दाखवून दिलेत. भारतीय संघाने या विश्वचषकात अव्वल स्थान पटकावलं ते आपल्या अष्टपैलू खेळाने. म्हणजेच भारतीय फलंदाजांनी तीनदा अडिचशे पेक्षा जास्त धावसंख्येचा पाठलाग केला आणि दोनदा भारतीय गोलंदाजांनी बलाढ्य संघांना दोनशेच्या आत रोखण्याची कामगिरी केली. फलंदाजी आणि गोलंदाजीत खेळाडू समसमान वाटा उचलत होते. यात कुलदीप यादव, आर अश्विन आणि रवी जाडेजाची फिरकीही उठून दिसत होती. मधल्या षटकांमध्ये धावा रोखण्याचं आणि वेगवान चेंडूनही फलंदाजाला चकवून त्याचा बळी टिपण्याचं काम कुलदीप बेमालूम करत होता. म्हणूनच २०२३ च्या हंगामात तो सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला होता. (Ind vs Nz)

पण, हाच कुलदीप यादव काल वारंवार कर्णधार रोहीत शर्माची नजर चुकवताना दिसत होता. कारण उघड होतं. गोलंदाजाची धुलाई होत असेल तर कर्णधाराला सामोरं जाणार कसं? रचिन रवींद्र आणि डेरिल मिचेल या किवी फलंदाजांचा जम बसत होता तेव्हा कुलदीप गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्याच षटकांत मिचेलने त्याला जोरदार षटकार लगावला. त्या पुढच्या षटकांत आणखी एक षटकार लगावला आणि रचिलही त्याच्या गोलंदाजीवर हवे तसे चौकार वसूल करत होता. (Ind vs Nz)

थोडक्यात काय भारताचा आतापर्यंतचा यशस्वी आणि भरवशाचा फिरकी गोलंदाज धरमशालात धावा लुटत होता. थोड्याफार फरकाने रवी जाडेजाचीही तीच अवस्था होती. दोघांनाही विकेट मिळत नव्हती आणि धावाही लुटत होत्या. फिरकी हे भारतीय गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र आहे आणि अशावेळी किवी फलंदाज ज्या पद्धतीने फिरकी खेळून काढत होते ती गोष्ट भारतीय संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारीच होती. (Ind vs Nz)

New Project 2023 10 23T143757.049

(हेही वाचा – Maratha Reservation : युद्ध पातळीवर येऊ नका मराठा आरक्षणासाठी वेळ लागू शकतो – गिरीश महाजन)

कुलदीपने २२ डावांमध्ये भारतासाठी सर्वाधिक ४४ बळी टिपले आहेत आणि यात पाच बळी टिपण्याची किमया एकदा तर चार बळी चारदा टिपले आहेत. न्यूझीलंड विरुद्ध मात्र रचिन रवींद्र आणि डेरिल मिचेल यांनी कुलदीपला सहजपणे खेळून काढलं. कुलदीपच्या २२ चेंडूंवर एकट्या मिचेलने ४५ धावा ठोकल्या. यात ३ षटकार आणि २ चौकार होते. कुलदीपने या हंगामात एका फलंदाजाला दिलेल्या या सगळ्यात जास्त धावा आहेत. (Ind vs Nz)

एखादा दिवस गोलंदाजासाठी वाईट असू शकतो. काल भारतीय क्षेत्ररक्षकांनी रवींद्र आणि मिचेलचे तीन झेलही टाकले. पण, तरीही ज्या सहजतेनं दोघं कुलदीप आणि जाडेजाला खेळत होते हे भारतीय संघासाठी नक्कीच धोकादायक आहे. पुढील सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांना वेगळी रणनीती आखावी लागणार आहे. किंवा या गोष्टीचा विचार तरी करावा लागणार आहे. भारताचा अजून दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या संघांशी मुकाबला बाकी आहे. आणि न्यूझीलंडचा संघाशीही आपली पुढे गाठ पडू शकते. (Ind vs Nz)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.