Israel-Hamas Conflict: हमास युद्धासाठी वापरतंय ‘Chemical Weapons’, इस्त्रायलच्या राष्ट्रपतींचा दावा

किबुत्जच्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये हत्याकांड करणारे काही दहशतवादी ठार झाले.

139
Israel-Hamas Conflict: हमास युद्धासाठी वापरतंय 'Chemical Weapons', इस्त्रायलच्या राष्ट्रपतींचा दावा
Israel-Hamas Conflict: हमास युद्धासाठी वापरतंय 'Chemical Weapons', इस्त्रायलच्या राष्ट्रपतींचा दावा

इस्त्रायल-हमासच्या युद्धाला ७ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. हमसाने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र डागून युद्ध सुरू केले. क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ल्यानंतर हमास आता युद्ध करण्यासाठी रासायनिक शस्त्रांचा (Chemical Weapons)वापर करून युद्ध करत आहे, असा दावा इस्त्रायलने केला आहे.

हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबरला म्युझिक फेस्टिव्हलवर हल्ला केला होता. त्यांना केमिक वेपन बनवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असा दावा इस्त्रायलचे राष्ट्रपती इसहाक हेर्जोग यांनी केला आहे. किबुत्जच्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये हत्याकांड करणारे काही दहशतवादी ठार झाले. त्यांच्या मृतदेहाच्या पडताळणीत काहींकडे केमिकल वेपन बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या साहित्यात सायनाइडचाही समावेश आहे.

(हेही वाचा – Israel Hamas War : ‘हमासबरोबरच्या युद्धात मध्ये पडलात, तर…; नेतान्याहू यांची हिजबुल्लाहला धमकी)

केमिकल वेपन बनवण्याचे जे साहित्य दहशतवाद्यांकडे सापडले आहे त्याचे कनेक्शन अल कायदाशी आहे. राष्ट्रपतींनी हा दावा सिद्ध करण्याासाठी अनेक कागदपत्रे माध्यमांसमोर दाखवली. यापूर्वीही ISISपासून अल कायदाने केमिकल वेपनचा वापर केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.