ऋजुता लुकतुके
विराट कोहली आणि लायनेल मेस्सी (Virat Kohli vs Lionel Messi ) आपापल्या खेळातील दिग्गज आहेत. जगभरात त्यांचा चाहता वर्ग पसरलेला आहे. त्यांची तुलना करण्याचा इथं हेतू नाही. पण, भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर एक मजेशीर आकडेवारी समोर आली आहे.
दोन दिग्गज खेळाडूंमधील हा मुकाबला आहे तो भारतात सगळ्यात जास्त प्रेक्षक वर्ग ऑनलाईन आणण्याचा. आणि यात विराट कोहलीने मेस्सीचा फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील आकडेवारी मागे टाकली आहे. म्हणजे असं की, विराट कोहली आपल्या शतकाच्या जवळ पोहोचला तेव्हा काल डिस्नी हॉटस्टार या सामन्यांचं थेट प्रसारण करणाऱ्या ओटीटी ॲपवर ४.३ कोटी प्रेक्षक एकाच वेळी सामन्याचा आनंद लुटत होते.
डिस्नी हॉटस्टारने फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावेळी जिओ सिनेमाने रचलेला ३.२ कोटी प्रेक्षकांचा विक्रम मोडला. फुटबॉलच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि फ्रान्सचे संघ आमने सामने होते. आणि तो सामना रोमहर्षक होऊन पेनल्टी शुटआऊटवर गेला होता.
Déjà woohoo! Another record-breaking performance by all of us! 🎉🥳
Time for a hat-trick?🤞#INDvNZ pic.twitter.com/IBm2V39dIl— Disney+ Hotstar (@DisneyPlusHS) October 22, 2023
डिस्नी हॉटस्टारने हे ट्विट टाकलं तेव्हा एका प्रेक्षकाने एक समर्पक प्रतिक्रिया दिली आहे. ही व्यक्ती म्हणते, ‘अंतिम सामन्यात भारत असेल तर हा आकडा ५ कोटींवर जाईल.’
विशेष म्हणजे विराट कोहली (Virat Kohli vs Lionel Messi) शतकापासून पाच धावांनी दूर होता तेव्हा हॉटस्टारवर सव्वा चार कोटी प्रेक्षक होते. पण, कोहली बाद झाल्यावर ही संख्या काही लाखांनी कमी झाली. रवींद्र जाडेजाने मग साडेतीन कोटी ऑनलाईन प्रेक्षकांच्या साक्षीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. आणि भारतीय संघाला चार गडी राखून विजय मिळवून दिला.
यापूर्वी भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यावेळीही प्रेक्षक संख्या साडेतीन कोटींवर पोहोचली होती.
View this post on Instagram
फुटबॉल विश्वचषकावेळी जिओ सिनेमाने ग्राहकांना सामना मोफत पाहू दिला होता. आणि डिस्नी हॉटस्टारवर फक्त नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच सामना पाहता येतो. असं असताना क्रिकेटसाठी झालेली गर्दी पाहता क्रिकेटची भारतातील लोकप्रियताच अधोरेखित होते.
शिवाय एकदिवसीय क्रिकेटला ओहोटी लागल्याची चर्चा असताना पुन्हा एकदा याच स्पर्धेत विक्रम झालेले पाहायला मिळत आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community