इस्रायलवर झालेल्या पाशवी हल्ल्यात इस्त्रायलचाच विजय होईल – रणजित सावरकर

इस्त्रायल आणि भारत यांचे शत्रू एकच

95
इस्रायलवर झालेल्या पाशवी हल्ल्यात इस्त्रायलचाच विजय होईल - रणजित सावरकर
इस्रायलवर झालेल्या पाशवी हल्ल्यात इस्त्रायलचाच विजय होईल - रणजित सावरकर

इस्रायलवर झालेल्या पाशवी हल्ल्यात इस्त्रायलचाच विजय होईल, असा विश्वास स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केला. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अर्थात खंडेनवमीला दादर, शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात सोमवारी, २३ ऑक्टोबर रोजी कॉन्सुल जनरल (महावाणिज्य दूत) कोबी शोशानी यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात अर्पण करण्यात आलेल्या तलवारीचे पूजन करण्यात आले. त्यावेळी रणजित सावरकर बोलत होते.

याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, विश्वस्त शैलेंद्र चिखलकर, सदस्य के. सरस्वती , कमलाकर गुरव, दीपक कानुलकर आणि परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक अनय जोगळेकर हे उपस्थित होते.

इस्त्रायल आणि भारत यांचे शत्रू एकच

इस्त्रायल-हमास युद्धासंदर्भात माहिती देताना रणजित सावरकर म्हणाले की, १४०० वर्षांपूर्वी जेव्हा इस्त्रायलमधून इस्लामी आक्रमकांनी ज्यूंना बाहेर काढलं. त्याच सुमारास जवळजवळ २०-३० वर्षांनी भारतातील सिंधवर पहिलं आक्रमण झालं. भारताच्या फाळणीच्या वेळेस इस्लामी जिहादींनी केलेले अत्याचार आजही भारत विसरलेला नाही. याच अत्याचाराची पुनरावृत्ती आता इस्त्रायलमध्ये झाली आहे. त्यामुळे भारतीय जनता इस्त्रायलच्या मागे ठामपणे उभी आहे, कारण आपल्या परंपरा समान आहेत. इस्त्रायल आणि भारत यांचे शत्रू एकच आहेत. विस्थापित झाल्यानंतर अनेक ज्यू भारतात सामावले गेले. आजही त्यांचे आणि आमचे संबंध आहेत. आजही मराठी बोलणारे ज्यू इस्रायलमध्ये आहेत आणि मला अभिमान आहे की, आज ते त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात झालेल्या शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त कॉन्सुल जनरल (महावाणिज्य दूत) कोबी शोशानी यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.